शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

जळगाव जिल्ह्यात साडे सात लाख विद्यार्थ्यांकडून मतदार जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 11:46 AM

घोषणांमधून नागरिकांना आवाहन

जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. या निवडणूकीत जास्तीत जास्त मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मतदान करावे, यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रम राबविले जात असून त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाभरात शनिवारी सर्व शाळा, महाविद्यालयात साडेसात लाख विद्यार्थ्यांच्या सहभागात विविध घोषणा देत मतदार जागृती करण्यात आली़ ‘बाळगा लोकशाहीचा अभिमान, चला करू मतदान’ यासह विविध घोषणा देण्यात आल्या़शनिवारी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये प्रभातफेरी काढून जनजागृती केली. सर्व शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावात रॅलीचे आयोजन करून जनतेत मतदानासंदर्भात माहिती देवून मतदानाची अधिकाधिक टक्केवारी वाढविण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर कलापथक, पथनाटयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मतदारांना बाळगा लोकशाहीचा अभिमान, चला करु मतदान, बोटावरील शाई, बळकट करील लोकशाही, चला सोडा सारे कामधाम, पहिले करु मतदान, सण आनंदाचा, सण उत्सवाचा, सण मतदानाचा, आपल्या एका मताचे महत्व जाणा, निर्भयपणे मतदान करा. यासारख्या अनेक घोषणांनी जागृती केली़ या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन नशिराबाद, ता. जळगाव येथे करण्यात आले होते. याप्रसंगी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी बी़ जे़ पाटील, जि़ प़ उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, गटशिक्षणाधिकारी सतीश चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चव्हाण, विस्तार अधिकारी फिरोज पठाण, यांसह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.असा होता विद्यार्थ्यांचा सहभागया उपक्रमातंर्गत शनिवारी जिल्ह्यातील २३४३ प्राथमिक शाळांमधील ३ लाख १३ हाजर ५०८ विद्यार्थी, ७०८ माध्यमिक शाळांमधील ३ लाख ५० हजार ९३८ विद्यार्थी, ९५ उच्च माध्यमिक शाळांमधील ५७ हजार ८२३ विद्यार्थी तर २४ हजार ९५० शिक्षक, आंगणवाडी सेविका, बचतगट, आशावर्कर असे एकूण ८ लाख ४७ हजार ११९ विद्यार्थी व इतर नागरीक सहभागी झाले होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव