अपघातानंतर ग्रामस्थांनी रोखला छत्रपती संभाजीनगर -जळगाव महामार्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 18:13 IST2025-09-06T18:12:39+5:302025-09-06T18:13:50+5:30
या मार्गावर दररोज मोठ्या संख्येने वाळू भरलेले डंपर भरधाव वेगाने येत असल्याने नेहमीच अपघात होतात.

अपघातानंतर ग्रामस्थांनी रोखला छत्रपती संभाजीनगर -जळगाव महामार्ग
मोहन सारस्वत, लोकमत न्यूज नेटवर्क, जामनेर (जळगाव) : वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने गजानन अरुण पाटील (३०, रा.नेरीदगार, ता.जामनेर) यांना धडक दिल्याने त्यांचा शुक्रवारी रात्री जागीच मृत्यू झाला. यामुळे नेरी ता. जामनेर येथील संतप्त ग्रामस्थांनी शनिवार दुपारी दोन तास जळगाव -- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंंदोलन केले.
या मार्गावर दररोज मोठ्या संख्येने वाळू भरलेले डंपर भरधाव वेगाने येत असल्याने नेहमीच अपघात होतात. पोलीस व महसूल प्रशासनाकडे तक्रार करून देखील गांभीर्याने घेतले जात नाही, असा आरोप नागरिकांनी यावेळी केला. पोलिसांनी डंपरचा पाठलाग करून चालकाला ताब्यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी आंदोलकांची समजूत घातल्याने रास्ता रोको मागे घेण्यात आले.