लोकमत समुहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांचा जळगावात एस.डी. सीडतर्फे सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 07:33 PM2018-11-18T19:33:03+5:302018-11-18T19:41:59+5:30

जळगावात एस.डी.सीडतर्फे शिष्यवृत्ती प्रदान सोहळा

Vijay Darda's Jalgaon SD Respect by Seed | लोकमत समुहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांचा जळगावात एस.डी. सीडतर्फे सन्मान

लोकमत समुहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांचा जळगावात एस.डी. सीडतर्फे सन्मान

Next
ठळक मुद्देसुरेशदादा जैन यांची ग्रंथतुलामान्यवरांचा सन्मानपत्र देऊन सत्कार

जळगाव : एसडी-सीड अर्थात सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजनेंतर्गत गरजू आणि गुणवंत अशा ६०० विद्यार्थ्यांना रविवार, १८ रोजी सकाळी महाबळ रोडवरील छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात मोठ्या थाटात शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. या सोहळ््यात लोकमत समुहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांचा एस.डी. सीडतर्फे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रसिद्ध उद्योजक व भारत विकास ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हणमंतराव गायकवाड (पुणे), माजी मंत्री सुरेशदादा जैन, एसडी-सीडच्या अध्यक्षा रत्नाभाभी जैन, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी महापौर रमेशदादा जैन, गव्हर्निंग बोर्ड चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, राजा मयूर, मेजर नाना वाणी, माजी प्राचार्य निळकंठ गायकवाड उपस्थित होते.
मान्यवरांचा सन्मानपत्र देऊन सत्कार
विजय दर्डा यांचा सुरेशदादा जैन व रत्नाभाभी जैन यांच्या हस्ते तर हणमंतराव गायकवाड यांचा प्रा.सोमवंशी व एस.डी. सीड गव्हर्निंग कौन्सीलच्या सदस्यांतर्फे शाल, मानपत्र, मोत्याची माळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सुरेशदादा जैन यांची ग्रंथतुला
सुरेशदादा जैन यांचा डॉ.सुभाष चौधरी व जळगाव पीपल्स बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सुरेशदादांची ग्रंथतुलाही करण्यात आली. या पुस्तकांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे.
मीनाक्षी जैन यांनी मानले आभार
एस.डी. सीडच्या कार्याध्यक्षा मिनाक्षी जैन यांनी काही लोकांचा सहवास आपल्याला नित्य लाभत नाही. मात्र त्यांच्यासोबतचे काही क्षणही आपले अनुभव समृद्ध करतात,असे सांगून ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, बीव्हीजी गृपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांच्यासह सर्व मान्यवरांचे आभार मानले. सूत्रसंचालन शंभू पाटील यांनी केले.

Web Title: Vijay Darda's Jalgaon SD Respect by Seed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.