शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

अनास्थेचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 1:48 PM

प्रशासनाचे कोणतेही पूर्वनियोजन नव्हते

मिलिंद कुलकर्णीनंदुरबार जिल्ह्यातील भूषा येथे नर्मदा नदीत बोट उलटून ५ बालकांसह सहा जणांचा झालेला मृत्यू हा प्रशासकीय अनास्थेमुळे झालेला आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये दुर्घटना होऊ नये, यासाठी खबरदारी घेणे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असून दुर्देवाने त्याकडे प्रशासकीय यंत्रणेचे कायम दुर्लक्ष होत आलेले आहे.मकरसंक्रांतीच्या पावनपर्वावर पवित्र स्रान आणि नदीपूजनाला आदिवासी बांधवांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुरातन अशी ही परंपरा आहे. असंख्य भाविक या पर्वासाठी येतात, हे जगजाहीर आहे. असे असताना प्रशासकीय यंत्रणेने तेथे काय खबरदारी घेतली, यासंबंधी खरेतर गांभीर्याने माहिती घेतली गेली पाहिजे. मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त असलेली बोट ही नर्मदा विकास विभागाने भाडेतत्त्वावर घेतलेली होती. क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी बसल्याने ही बोट नदीपात्रात उलटली आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली, असा प्राथमिक निष्कर्ष काढला जातो. दुर्गम भागातील या दुर्घटनेचे जे व्हीडिओ प्रसारीत झाले आणि प्रत्यक्षदर्र्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या पावन पर्वासाठी किमान ८-१० बोटी कार्यरत होत्या. या बोटीच्या टपावर लोक बसले होते. क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्याने बोट कलंडली आणि उलटी झाली. बंदिस्त बोट असल्याने मोठी माणसे पोहून बाहेर निघू शकली, परंतु लहान मुले आणि वृध्दांना निघता आले नाही.या दुर्घटनेविषयी समोर आलेल्या माहितीवरुन, या पावन पर्वासाठी प्रशासनाचे कोणतेही पूर्वनियोजन नव्हते. नियोजन नसल्याने खबरदारीच्या उपाययोजनांचा प्रश्नच उद्भवत नाही. शहरी भागात गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात मूर्ती विसर्जनावेळी पट्टीचे पोहणारी माणसे, पोलीस दल, गृहरक्षक दल, आपत्ती व्यवस्थापन दल अशी यंत्रणा तैनात असते. पण दुर्गम भाग, आदिवासी वस्तींपर्यंत आमचे प्रशासन पोहोचलेच नाही, याचा हा ठसठशीत पुरावा आहे. आदिवासींच्या उत्थानाच्या मोठ्या गप्पा करायच्या, पंतप्रधानांच्या आकांक्षित जिल्ह्यांत समावेश करायचा, मोठा निधी द्यायचा, पण आदिवासींच्या प्रथा, परंपरा, वारसा याविषयी अनभिज्ञ राहायचे, असेच प्रशासकीय यंत्रणेचे धोरण राहिले आहे. आदिवासी भागात दोन वर्षांचा कालावधी व्यतीत करण्याची सक्ती भारतीय प्रशासकीय सेवेच्या अधिकाऱ्यांना केल्याने ही मंडळी याठिकाणी येतात तरी, पण मनापासून किती अधिकारी काम करतात, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. आदिवासी बांधवांची अस्तंबा यात्रा, भोंगºया, होलिकोत्सव, दिवाळी अशी पारंपरिक सणांची खास वैशिष्टये आहेत. त्याची किमान माहिती करुन घेणे, हे सण आनंद आणि उत्साहाने साजरे होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे सहकार्य उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी प्रशासनावर येते. प्रशासनाविषयी आत्मियता, ममत्व वाटावे, यासाठी हे स्वागतार्ह पाऊल आहे. लोकसहभागाशिवाय हगणदरीमुक्ती, साक्षरता, लसीकरण असे राष्टÑीय कार्यक्रम यशस्वी होत नाहीत, हा अनुभव लक्षात घेता आदिवासी बांधवांच्या जिव्हाळ्याच्या विषयांमध्ये प्रशासनाने पुढाकार घेऊन सहकार्य केले तर प्रशासन आणि जनतेमध्ये अंतर कमी होऊ शकेल. भूषा येथील दुर्घटनेचा एवढा बोध जरी प्रशासकीय यंत्रणेने घेतला तरी पुन्हा अशा दुर्घटना टाळता येऊ शकतील.