विचखेडे येथे ग्रामपंचायत बिनविरोध निवडीसाठी ग्रामस्थांनी काढले जाहीर पत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 03:10 PM2020-12-25T15:10:22+5:302020-12-25T15:11:30+5:30

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काही पदाधिकाऱ्यांनी गावातना जाहीर आवाहन करीत एक प्रसिद्ध पत्रक घरोघरी वितरित केले आहे.

In Vichkhede, a public notice was issued by the villagers for unopposed Gram Panchayat election | विचखेडे येथे ग्रामपंचायत बिनविरोध निवडीसाठी ग्रामस्थांनी काढले जाहीर पत्रक

विचखेडे येथे ग्रामपंचायत बिनविरोध निवडीसाठी ग्रामस्थांनी काढले जाहीर पत्रक

Next

पारोळा : तालुक्यातील विचखेडे येथे होऊ घातलेली ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काही माजी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गावात ग्रामस्थांना जाहीर आवाहन करीत एक प्रसिद्ध पत्रक घरोघरी वितरित केले आहे.
    गत काळातील माजी सरपंच विजय रंगराव पाटील व अशोक सहादू साळी यांनी आम्ही दोन्ही निवडणूक लढणार नाहीत वा पॅनलदेखील उभे करणार नाही. नवीन लोकांना नेतृत्वाची संधी देत सामाजिक एकोपा जपत भाऊबंदकीचा वाद चव्हाट्यावर येऊ न देता प्रत्येक समाजाने एकमताने योग्य उमेवार देऊन नऊ सदस्य बिनविरोध असे होतील. यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा व गावाची निवडणूक बिनविरोध करून तालुक्यात एक आदर्श निर्माण करावा, अशी भावनिक साद या निवडणूक प्रसिद्ध पत्रकातून ग्रामस्थांना घेतली आहे.
यात उमेदवार देताना त्या त्या समाजाने गावात रहिवास असलेला व लोकांच्या संपर्कातील उमेदवार बिनविरोध करावा, ग्रामस्थांच्या सुखा-दुःखात धावून कामात येणारा उमेदवार असावा, आपल्या पदाचा वापर गावाच्या कल्याणासाठी करणारा उमेदवार बिनविरोध करा, असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
आता विचखेडे ग्रामस्थ किती प्रतिसाद या आवाहनाला देतात हे ४ जानेवारीलाच समजेल.

Web Title: In Vichkhede, a public notice was issued by the villagers for unopposed Gram Panchayat election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.