‘नदीजोड’ तांत्रिक सल्लागारपदी व्ही.डी.पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 12:06 IST2019-08-03T12:06:32+5:302019-08-03T12:06:44+5:30
अनेक योजनांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

‘नदीजोड’ तांत्रिक सल्लागारपदी व्ही.डी.पाटील
जळगाव : नदीजोड प्रकल्पाबाबत शासनाचे तांत्रिक सल्लागार म्हणून तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता तथा माजी राज्य माहिती आयुक्त व्ही.डी.पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकात्मिक राज्य जल आराखड्यात राज्यातील विविध नदीजोड प्रकल्प, वळण योजना प्रस्तावित आहेत. या योजनांपैकी तुटीच्या तापी खोऱ्यात, गोदावरी खोºयात विपुलतेच्या पश्चिम वाहिनी (कोकण) खोºयातून पाणी वळविण्यासाठीच्या वळण योजना तातडीने घेणे आवश्यक आहे. यापैकी अनेक योजनांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. राज्यात नदीजोड योजनेचा प्राधान्यक्रम निश्चित होणे आवश्यक आहे. तसेच उपस वळण योजनांचे मापदंड ठरविणे, या योजनांच्या विविध तांत्रिक बाबी ठरविणे, नियोजन करणे आदी संदर्भात शासनास सल्ला देण्यासाठी तसेच या संदर्भात नेमण्यात आलेल्या विविध तज्ज्ञ समितीत विश्ोष निमंत्रित म्हणून मार्गदर्शन करण्यासाठीही नियुक्ती करण्यात आली आहे.