शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वरुणराजाची कृपा सात तालुके शतकाच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 12:10 IST

अमळनेर व एरंडोलला झोडपले

जळगाव : गणेशोत्सवाच्या पर्वात वरूणराजाने जिल्हाभरात सलग दोन दिवस दमदार हजेरी लावली़ सोमवारी जिल्हाभरात ४११ मिमी पाऊस झाला़ अमळनेर व एरंडोल तालुक्याला पावसाने झोडपून काढले या ठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंद आहे़ या वर्षी यावल व रावेर तालुक्याने शंभरी पार केली असून सात तालुके शतकाच्या उबंरठ्यावर आहेत़या वर्षी सुरवातील दडी मारलेल्या पावसाने नंतर जिल्हाभरात दमदार हजेरी लावली़ धरणांमधील पाणी साठा झपाट्याने वाढल्याने पाण्याचा बिकट प्रश्न मिटल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून वरूणराजाच्या कृपेने बळीराजा सुखावला आहे़ रविवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर सोमवारी एरंडोल तालुक्यात ५८़ ३ मिमी पावसाची नोंद झाली़ त्या खालोखाल अमळनेरमध्ये ५५़८ मिमी पाऊस झाला़ पाचोरा, रावेर, बोदवड, भुसावळ जळगावला कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली़ सरासरीत यावल १०४ मिमी तर रावेल तालुक्यात ११३़ ८ मिमी, यानंतर मुक्ताईनगर ९९़ ८ मिमी, एरंडोल ९९़ ८, भुसावळ ९९़ १, अमळेर ९७़ ५, चोपडा ९६़६, जामनेर ९५़५, बोदवड ९४़७ हे तालुके शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत़गिरणा दुथडी वाहू लागल्याने परिसरात उत्साहपावसामुळे रात्री पासून गिरणा नदी दुथडी भरुन वाहत असल्याने परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.नदी पाात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने गणेश भक्तांमध्ये आनंद व्यक्त होत आहे़ पुढील दोन दिवसात गणेशाचे विसर्जन होणार आह़े गिरणा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने सर्वच मंडळाना सावध होऊन गिरणा पात्रात विसर्जन करावे लागणार आहे़दापोरा बंधारा ओसंडून वाहू लागलापावसामुळे दापोरा, कांताई, लमांजन हे सर्व बंधारे पूर्ण भरून वाहत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी पातळी वाढणार आहे. त्यामुळे आगमाी काळातील गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे़ जळगाव जिल्ह्यातील निम्मे गावासह चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल यासारख्या मोठ्या शहराचा भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे .

टॅग्स :Jalgaonजळगाव