शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

उद्योग क्षेत्रात काम करण्यासाठी मूल्ये व सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 7:50 AM

‘गती‘तर्फे कौशल्य प्रशिक्षण सर्वेक्षण : इंग्रजी संभाषण समजण्याला ३१ टक्के युवकांनी दिले महत्त्व

जळगाव  - उद्योग क्षेत्रात काम करण्यासाठी युवकांमध्ये मूल्ये व सकारात्मक दृष्टिकोन हे कौशल्य महत्त्वाचे आहे तर इंग्रजी संभाषण काळजीपूर्वक ऐकणे व समजणे महत्त्वाचे असल्याचा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून पुढे आला आहे. एवढेच नाही तर व्यावसायिक शिष्टाचार, शिकण्याची तयारी, कल्पकता व टीमवर्क या कौशल्यांचा अभाव दिसून आला. उत्तर महाराष्ट्रातील उद्योगविश्वाचा गरजा पूर्ण करण्याचा दृष्टीने ‘गती’ (गोखलेज अ‍ॅडव्हॉन्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ) या संस्थेच्यावतीने दोन वेगवेगळे सर्वेक्षण करण्यात आले. उद्योग क्षेत्रात आवश्यक कौशल्य व इंग्रजी भाषेचे महत्त्व या कौशल्यांवर ३६५ युवक व उद्योजकांचे मतं जाणून घेण्यात आले.

‘गती’तर्फे पहिले सर्वेक्षण उद्योगामध्ये काम करताना युवकांमध्ये आवश्क सूक्ष्म कौशल्याबाबत करण्यात आले. यात शहरातील ११० उद्योजकांचे सर्वेक्षण करण्यात आले, यामध्ये २१ प्रकारचे उद्योगांचा समावेश होता. त्यात पॉलीमर, प्लॉस्टिक, इलेक्ट्रिकल आणि फेब्रीकेशन या उद्योगांचा सहभाग होता. उद्योग संस्थेत नव्याने होणारे पदविका व पदवीधर विद्यार्थी यांच्याकडून अपेक्षित असलेल्या विविध सूक्ष्म कौशल्यांचा अभ्यास या सर्वेक्षणात करण्यात आला. यातून महत्त्वपूर्ण मुद्दे समोर आले आहेत.२.९५ टक्के उद्योजकांच्या मते मूल्ये आणि सकारात्मक दृष्टिकोन हे कौशल्य सगळ्यात महत्वाचे आहे. त्या खालोखाल ९४ टक्के उद्योजकांनी परिणामकारक संवाद कौशल्याला प्राधान्य दिले आहे. एकूणच सर्वेक्षणात सकारात्मक कार्य संस्कृती यावर भर देण्यात आला आहे.

हे मुद्दे नोकरीसाठी अडसरया सर्वेक्षणात विद्यार्थी व कामगार यांच्याकडून अपेक्षित असलेल्या विविध सूक्ष्म कौशल्यांवरदेखील अभ्यास करण्यात आला. त्यांचे प्रश्न व त्यांच्याकडून अपेक्षित असलेले कौशल्य पाहता सध्यस्थितीत दिले जाणारे शिक्षण व कामागारांचा बदलता दृष्टिकोन हे मुद्दे नोकरीसाठी अडसर ठरत असल्याचे दिसून आले. तसेच व्यावसायिक शिष्टाचार, शिकण्याची तयारी, कल्पकता व टिमवर्क या कौशल्यांचा अभाव दिसून आला.दुसरे सर्वेक्षण ‘व्यावसायिक इंग्रजी’ या विषयावर करण्यात आले. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील व्यावसायिक महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक व उद्योग क्षेत्रातील अधिकाऱ्यांचे मते जाणून घेण्यात आली. या सर्वेक्षणासाठी संजय प्रभुदेसाई, प्रा.एस.एम.छापेकर, व्ही.एम.भट, एम.जे.चौधरी , प्रा.चारुदत्त गोखले, आर.व्ही.पाटील, प्रा.एस.ओ.दहाड यांनी मार्गदर्शन केले.१५० प्राध्यापकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ६५ टक्के प्राध्यापकांनी ई-मेल व विविध व्यावसायिक अर्ज आणि पत्रांसाठी अचूक इंग्रजी लिखाण हे महत्त्वपूर्ण कौशल्य असल्याचे सांगितले. त्या खालोखाल इंग्रजी संभाष काळजीपूर्वक ऐकणे व समजणे या मुद्याला ६४ टक्के प्राध्यापकांनी संमती दिली.

विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणात २५५ च्यावर अभिप्राय घेण्यात आले. यात अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि व्यवस्थापन विद्याशाखेतील विद्यार्थी सहभागी होते. ३१ टक्के विद्यार्थ्यांनी इंग्रजी संभाषण काळजीपूर्वक ऐकणे व समजण्याला प्राधान्य दिले. २८ टक्के विद्यार्थ्यांच्या मते इंग्रजी शब्दांचे अचूक स्पेलींग व २७ टक्के विद्यार्थ्यांच्या मते संभाषण करतेवेळी योग्य काळ वापरणे महत्त्वाचे आहे.याशिवाय उद्योग संस्थामधील ५० अधिका-यांचा अभिप्राय घेण्यात आला. ७० टक्के अधिका-यांचा मते ई-मेल व व्यावसायिक अर्ज किंवा पत्रांसाठी अचूक इंग्रजी लिखाण महत्त्वपूर्ण कौशल्य असल्याचे मत व्यक्त केले. या सर्वेक्षणाचा अहवाल विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.

टॅग्स :englishइंग्रजी