शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

जळगावात भाजपच्या विजयरथाला बंडाळीची ‘मोगरी’

By विलास बारी | Published: April 02, 2024 9:29 PM

उन्मेष पाटलांची भूमिका ठरणार भाजपसाठी डोकेदुखी

जळगाव :जळगाव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून धक्कातंत्राचा अवलंब केला. त्यामुळे नाराज झालेले उन्मेष पाटील व भाजपचे एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्रप्रमुख करण पवार यांना आपल्या गोटात सहभागी करून घेण्याची खेळी करीत, उद्धवसेनेने भाजपसमोरील डोकेदुखी वाढविली आहे. त्यामुळे भाजपला आता जळगाव लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रारंभी वाटली होती तेवढी सोपी राहिलेली नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भाजप एकतर्फी विजय खेचून आणत आहे. यावेळी भाजपने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी घोषित केली. त्यानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली. ती नेमकी हेरत उद्धवसेनेने या मतदारसंघात सक्षम पर्यायाचा शोध सुरु केला होता. तो शोध उन्मेष पाटील व करण पवार यांच्यापर्यंत येऊन थांबला असल्याचे दिसत आहे.

बदलणार समीकरणखासदार उन्मेष पाटील, करण पवार यांनी मंगळवारी उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. उभय नेते बुधवारी `मातोश्री’वर शिवबंधन बांधणार असल्याच्या चर्चा आहेत. नव्याने तयार होणाऱ्या या समीकरणामुळे लढतीचे चित्र बदलू शकते. उद्धवसेनेने स्वत: उन्मेष पाटील किंवा त्यांच्या अर्धांगिनी संपदा पाटील अथवा करण पवार यांना उमेदवारी दिल्यास भाजपसाठी लढत प्रारंभी भासत होती तेवढी सोपी राहणार नाही, असा राजकीय निरीक्षकांचा कयास आहे.

शिवसेनेतील बंडानंतर जळगावातील उद्धवसेनेतील नेते शिंदेसेनेत गेले असले तरी, कार्यकर्ते मात्र मोठ्या प्रमाणात उद्धवसेनेच्या बाजूने आहेत. त्यामुळे उन्मेष पाटील व करण पवार यांच्या पक्षप्रवेशानंतर चाळीसगाव, पारोळा व एरंडोल या तीन तालुक्यांमध्ये उद्धवसेना मजबूत होणार आहे. शिवाय पाचोरा, भडगाव, तसेच जळगाव शहर व तालुक्यात उद्धवसेनेचे संघटन अजूनही चांगले आहे.

गिरीश महाजन, मंगेश चव्हाण यांची डोकेदुखी वाढणार !

मंत्री गिरीश महाजन व चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यामुळे उन्मेष पाटील यांचे तिकीट कापले गेल्याची आणि त्यामुळे नाराजी वाढल्याची भाजपमधील अनेकांची भावना आहे. पाटील व पवार यांचा समर्थकांसह उद्धवसेनेत प्रवेश झाल्यास भाजपच्या या दोन नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. दुसरीकडे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चाही सुरु आहे. त्यामुळे भाजपमधील खडसे समर्थक सक्रिय झाल्याची डोकेदुखी वेगळीच असेल.

टॅग्स :JalgaonजळगावBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस