अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; रेल्वेत कर्मचारी असलेले २ युवक जागीच ठार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2021 23:06 IST2021-06-20T23:06:17+5:302021-06-20T23:06:32+5:30

गेल्या चार दिवसापूर्वीच याच मार्गावर दोन भावडांचा बळी गेला होता. रविवारी  पुन्हा दोन तरुण ठार झाले.

An unidentified vehicle hit a two-wheeler; Two railway employees killed in bhusawal | अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; रेल्वेत कर्मचारी असलेले २ युवक जागीच ठार 

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; रेल्वेत कर्मचारी असलेले २ युवक जागीच ठार 

भुसावळ -अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार दोन तरुण ठार झाल्याची घटना नाहटा चौफुलीनजीक रविवारी रात्री ९.३० वाजता घडली. हे दोघे रेल्वे कर्मचारी होते. 

गेल्या चार दिवसापूर्वीच याच मार्गावर दोन भावडांचा बळी गेला होता. रविवारी  पुन्हा दोन तरुण ठार झाले. शेख शारीक शेख इद्रीस (२३) आणि अल्लाउद्दीन   बशीरोद्दीन शेख (२४, दोघे रा. ग्रीन पार्क, भुसावळ)  अशी या ठार झालेल्या  तरुणांची नावे आहेत. ते जळगावहून भुसावळकडे  जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात ते जागीच ठार  झाले. दोघेही अनुकंपा तत्वावर 
रेल्वेत नोकरीला लागले होते.

Web Title: An unidentified vehicle hit a two-wheeler; Two railway employees killed in bhusawal

टॅग्स :railwayरेल्वे