रेल्वेतून पडल्याने अज्ञात व्यक्तीचा मृत्यू 

By विजय.सैतवाल | Updated: September 20, 2023 17:33 IST2023-09-20T17:32:43+5:302023-09-20T17:33:02+5:30

माहिजी रेल्वेस्टेशननजीक धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी ४० ते ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.

Unidentified person dies after falling from train | रेल्वेतून पडल्याने अज्ञात व्यक्तीचा मृत्यू 

रेल्वेतून पडल्याने अज्ञात व्यक्तीचा मृत्यू 

जळगाव: माहिजी रेल्वेस्टेशननजीक धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी ४० ते ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार, २० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी जळगाव लोहमार्ग पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृताची ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.

माहिजी रेल्वे स्थानकजवळील रेल्वे खांबा क्रमांक ३८५ / १३ जवळ कोणत्यातरी धावत्या रेल्वेतून हा अनोळखी व्यक्ती खाली पडला. याबाबत माहिजी रेल्वे स्टेशन प्रबंधकांनी या घटनेची माहिती जळगाव रेल्वे पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आला. यात मृताची ओळख पटली नाही. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृताची ओळख पटविण्यासाठी नातेवाइकांनी जळगाव रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. पुढील तपास पोलिस नाईक हिरालाल चौधरी करीत आहेत.

Web Title: Unidentified person dies after falling from train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.