नदीमध्ये आढळला अनोळखी मृतदेह; पोलिसांनी केले अंत्यसंस्कार
By विवेक चांदुरकर | Updated: August 9, 2023 15:34 IST2023-08-09T15:33:51+5:302023-08-09T15:34:15+5:30
पोलिस पाटील प्रमोद श्रीनाथ यांनी जळगाव जामोद पोलिस स्टेशनला याबाबत तक्रार दिली

नदीमध्ये आढळला अनोळखी मृतदेह; पोलिसांनी केले अंत्यसंस्कार
विवेक चांदूरकर
जळगाव जामोद (बुलढाणा) : तालुक्यातील गोळेगाव येथे सुसरी नदीच्या पात्रात कुजलेल्या अवस्थेत अनाेळखी इसमाचा मृतदेह आढळला.
पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग इंगळे व पोलिस उपनिरीक्षक दोडके यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
पोलिस पाटील प्रमोद श्रीनाथ यांनी जळगाव जामोद पोलिस स्टेशनला याबाबत तक्रार दिली. मृतदेह सुसरी नदीपात्रातील बंगाली काट्यांमध्ये पडला होता. ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टरांना बोलावून घटनास्थळीच पंचनामा करून अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतदेह नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहत आल्याचे पाेलिसांनी सांगितले. पुढील तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दोडके करीत आहेत.