शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

कोरोनामुळे उसळलेल्या बेरोजगारीत संपले जीवनगाणे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 11:56 PM

बेरोजगारीने हैराण झालेल्या दोघा युवकांनी आत्महत्या केल्याने रावेर तालुका हादरला आहे.

ठळक मुद्देएका विवाहित युवकाची आत्महत्या तर दुसर्‍याची रेल्वेगाडीच्या धडकेने जीवनच झाले ‘लॉकडाऊन ’

लोकमत न्यूज नेटवर्क

रावेर : शहरातील राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकालगतच्या श्री हनुमान वाड्यातील एक ३२ वर्षीय विवाहित युवकाने जुन्या घरी वरच्या खोलीत रात्री गळफास घेऊन तर गांधी चौक भागातील एका ४२ वर्षीय विवाहित युवकाचा रावेर - निंभोरा रेल्वे मार्गावरील अजंदे रेल्वेगेटच्या पुढे धावत्या रेल्वेगाडीच्या धडकेने अकस्मात मृत्यू झाल्याची घटना आज घडली.

शहरातील सरदारजी शॉपीिग कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या ‘हर्ट-टच’ सिनेमॅटोग्राफी व्हिडिओग्राफर व व्हिडिओ एडीटर असलेल्या गणेश महाजन यांचा धाकटा भाऊ प्रमोद जगन्नाथ महाजन (३२, हनुमान वाडा, रावेर) हा पत्नी व थोरल्या वहिणी या पातोंडा (म. प्र.) येथे त्यांच्या धाकट्या बहिणीच्या साखरपुड्यानिमीत्त गेल्या होत्या. जुन्या राहत्या घरी नेहमीप्रमाणे रात्री झोपण्याकरीता गेला असता घरी एकटाच असल्याची संधी साधून त्याने जुन्या घरातील वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत छताच्या कडीस दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सकाळी प्रमोद लवकर घरी न परतल्याने वडील त्याला पाहण्यासाठी गेले असता ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. गतवर्षीच्या लॉकडाऊनपासून बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आल्याने व पुन्हा लॉकडाऊनची घोषणा झाल्याच्या नैराश्यातून त्याने ही आत्महत्या केल्याचे समजते. आई-वडील, दोन भाऊ, पत्नी व एक वर्षांचा चिमुरडा प्रणय असा संसार उघड्यावर पडल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे. शहरातील मनसेचे तालूकाप्रमुख संदीपसिंग राजपूत यांचे थोरले बंधू व रावेर न. पा.च्या घंटागाडीवरील रोजंदारीवरील वाहनचालक निलेशसिंग दरबारसिंग राजपूत (४२, गांधी चौक, रावेर) यानेही रोजगाराच्या शोधात भटकंती करीत असताना धावत्या रेल्वेगाडीची धडक लागून अकस्मात मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री साडेबारा वाजेपूर्वी रावेर रेल्वे स्थानक ते निंभोरा स्थानकांदरम्यानच्या अजंदे-विवरे रेल्वे गेटनजीकच्या खंबाा क्रमांक ४७५जवळ घडली. रावेर रेल्वे स्थानक अधिक्षक राजेशकुमार यादव यांनी दिलेल्या खबरीवरून, रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

मयत निलेशसिंग राजपूत याच्या खिशात आढळून आलेल्या मोबाईलवरून पो. हे. कॉ. अर्जुन सोनवणे व पो. ना. अजय खंडेराव यांनी त्याच्या मृतदेहाची ओळख पटवली. त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे पत्नी व लहानगा १४ वर्षीय मुलगा असा कोवळा संसार उघड्यावर पडल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे. 

दोन्ही युवकांचा संसार उघड्यावर

शासनाने कोरोनाच्या साथरोगातील ‘ब्रेक- दी- चेन’ च्या लागू केलेल्या मिनीलॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी पहाटे उघडकीस आल्याने शहरात एकच शोककळा पसरली. कोरोना साथरोगाच्या लॉकडाऊनपासून उसळलेल्या बेरोजगारीच्या भस्मासुरामुळे या दोन्ही बेरोजगार युवकांचा आपला संसार उघड्यावर पडल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी रावेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावRaverरावेरCrime Newsगुन्हेगारीcorona virusकोरोना वायरस बातम्या