शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भरसभेत 'टरबुज्या' शब्द उच्चारत उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली म्हणाले, "असा माणूस..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 16:37 IST

तीन वाक्यात तब्बल पाच वेळा केला 'टरबुज्या' शब्दाचा उल्लेख

Uddhav Thackeray vs BJP : भाजपा विरूद्ध इतर विरोधी पक्ष असा लढा महाराष्ट्रात आता हळूहळू अधिकच तीव्र होताना दिसतो आहे. सुरूवातीला शिंदे गट आणि नंतर अजित पवार गट यांच्या पाठिंब्याने भाजपा युतीचे सरकार राज्यात अधिक मजबूत होत आहे. अशातच जालना येथे मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लागले. आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केल्याचा दावा करत, पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. त्यामुळे हे आंदोलन अधिकच चिघळल्याचे चिन्ह आहे. तशातच आज जळगाव मध्ये उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी एकदा नव्हे तर तब्बल ४-५ वेळा टरबुज्या असा शब्द उच्चारला.

उद्धव ठाकरे म्हणाले, "मुख्यमंत्र्यांना G20 परिषदेसाठी दिल्लीला जायला वेळ आहे, पण जालना मध्ये जरांगे यांच्याशी संवाद साधायला वेळ नाही. त्यांच्या मागण्या काय इतकं तरी त्यांनी विचारायला हवे. पण तसे घडले नाही. पोलिसांनी खरं खरं सांगावं की आपल्या मनात आलं म्हणून शांततेत सुरू असलेल्या आंदोलनात तुम्ही तुमचा ताफा घुसवू शकता का? एखाद्या आंदोलनकर्त्यांच्या समुदायावर स्वत:च्या मनाने लाठीचार्ज करू शकता का? हवेत गोळीबार किंवा अश्रूधुराच्या नळकांड्या फोडू शकता का? मला स्पष्टपणे असं वाटतं की जसा काही वर्षांपूर्वी जालियनवाला बाग हत्यांकांड झालं होतं, तसा हा कोणी तरी 'जालनावाला कांड' करू पाहतंय.... सगळ्यांच्या तोंडी एकच नाव आहे"

तब्बल ५ वेळा उच्चारला टरबुज्या शब्द 

ठाकरेंच्या त्या वाक्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांमधून जोरजोरात ओरडाआरडा ऐकू आला. त्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा बोलू लागले. ते पुढे म्हणाले,"आता ऐका, मला हा माणूस माहिती नाही, तुम्ही जे टरबुज्या नाव घेताय असा माणूस मी पाहिलेला नाही. टरबुज्या म्हणालात ना... टरबुज्या... काय म्हणालात टरबुज्या... म्हणजे ते असं मोठं टरबूज असतं ते? मी, असा माणूस पाहिलेला नाही, पण तुम्ही टरबुज्या म्हणालात ना... ठीक आहे, आता मी टरबुजा सारखा (दिसणारा) माणूस बघतो. टरबूज कोण आहे ते पण मी बघेन, पण तुम्हाला माहितीये, मला नंतर सांगा."

दरम्यान, भाजपा पक्ष संपवल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) केला. "देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा संपवला. नाथाभाऊला संपवलं. सफाचट केलं. सर्व उपरे घेतले. आयाराम घेतले. भाजप कार्यकर्त्यांच्या उरावर बसवले. सर्व आयाराम आहेत. अयोध्येत राम मंदिर बनवलं जात आहे, तसंच आयाराम मंदिर बनवणार आहेत. हे आयाराम लोकं आहेत," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रMaratha Reservationमराठा आरक्षण