शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
3
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
4
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
6
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
7
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
9
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
10
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
11
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
12
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
13
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
14
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
15
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
16
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
17
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 
18
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर
19
‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला
20
‘एअर टर्ब्युलन्स’ची माहिती मिळणार, प्रवासी सुरक्षेसाठी विशेष सॉफ्टवेअरची ‘इंडिगो’कडून चाचणी

Uddhav Thackeray: 'यांनी निवडणुकीसाठी आपले जवान मारले असतील तर...', उरी हल्ल्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 8:56 PM

'सत्यपाल मलिक उरी हल्ल्याबाबत बोलले, त्यांच्या मागे CBI लावली.'

जळगाव: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जळगावातील पाचोऱ्यात जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपसह नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. आज सगळीकडे असं वातावरण तयार केलं जातंय, जसं काय लोकांना काही कळतंच नाही. मोदी पूर्वी म्हणायचे, महागाई कमी झाली की नाही झाली...पेट्रोलचे भाव कमी झाले की नाही झाले...आता 'अब की बार' बस झालं. यांना 'आपटी बार' दाखवावाच लागेल, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच, यावेळी त्यांनी उरी हल्ला आणि सत्यपाल मलिकांच्या गौप्यस्फोटावरही प्रतिक्रिया दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले, मी इथे आल्यावर काही जणांनी घोषणा दिल्या, कोण आला रे कोण आला, गद्दारांचा बाप आला. मी नाही रे बाबा त्यांचा बाप. असल्या गद्दार औलादी आपल्या असूच शकत नाहीत. यांना स्वतःचं काही नाही. बाप चोरणारे आहेत हे. ढेकणं मारायला तोफेची गरज नसते. हे ढेकणं तुमचं रक्त पिलेली ढेकणं आहेत. यांना मारायला फक्त एक बोट लागेल. आज माझ्याकडे काहीच नाही, त्यांनी शिवसेना नाव चोरले, धनु्ष्यबाण चोरले, माझे वडील चोरत आहेत. माझ्याकडे काहीच नसताना तुम्ही कसकाय आलात, तर तुम्ही काही घेणारे नाही, तर आशीर्वाद देणारे आहात. दोन-पाच इकडे तिकडे गेले असतील, पण हे लाखो लोक आमच्या बाजूने आहेत, असं ठाकरे म्हणाले.

ते पुढे म्हणतात, तिकडे सत्यपाल मलिकांनी उरी हल्ल्याबाबत मोठी माहिती दिली. त्यांनी भ्रष्टाचाराची माहिती समोर आणली. त्यांच्या मागे सीबीआय लावली. काल-परवा काही जवान शहीद झाले. ते सोडून भाजप कर्नाटकच्या निवडणुकीत व्यस्त आहेत. आज विरोधकांच्या मागे सीबीआय, ईडी लावली आहे. भाजपात येता की, तुरुंगात जाता. आमच्यात असले की, ते भ्रष्ट असतात आणि तुमच्यात आले की शुद्ध होतात. सत्यपाल मलिक म्हणाले तसं, यांनी निवडणुकीसाठी जवान मारले असतील, तर अशा लोकांसाठी आपण आपले सुपूत्र यांच्यावर ओपाळून टाकायचे का? यांना किती दिवस चालवून घेणार? या भगव्यावर त्या चोरांचा अधिकार नाही. खंडोजी खोपडेच्या हातात भगवा शोधून दिसत नाही. यांना स्वतःच काही नाही, दुसऱ्यांच चोरावं लागतं, अशी जहरी टीका त्यांनी यावेळी केली. 

ते पुढे म्हणतात, राहुल गांधींनी अदानीवर प्रश्न विचारले, उत्तर कोण देणार? हा प्रश्न फक्त राहुल गांधांना नाही, तर देशातील प्रत्येकाला पडतोय. शेतकरी म्हणतोय, आम्ही दिवसभर राब-राब राबतो आणि हा मोदींचा मित्र लगेच इतका श्रीमंत होतो. मिंध्ये सरकार म्हणतात, आमचं सरकार घेणारं नाही, देणारं आहे. तुम्ही काय दिलं? मी घरात बसून सरकार चालवतो असं म्हणतात, हो आम्ही चालवलं. मी घरात राहून चांगलं सरकार चालवलं, तुम्ही बाहेर फिरुन चालवता येत नाही, असंही ते यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेJalgaonजळगावEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी