चारचाकी अन् दुचाकी यांच्यात जोरदार धडक, दोन तरुण जागीच ठार, चाळीसगावमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 00:00 IST2021-12-13T23:55:14+5:302021-12-14T00:00:02+5:30
प्रकाश एकनाथ बाविस्कर ( २४ ) विजय दगडू मोरे ( २५ ) अशी ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.

चारचाकी अन् दुचाकी यांच्यात जोरदार धडक, दोन तरुण जागीच ठार, चाळीसगावमधील घटना
जळगाव: चारचाकी आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक होऊन त्यात दोन जण तरुण जागीच ठार तर एक जण जखमी झाला. ही घटना चाळीसगावनजीक बिलाखेडजवळ सोमवारी सायंकाळी सात वाजता घडली. अपघात घडताच चारचाकी चालक पसार झाला.
प्रकाश एकनाथ बाविस्कर ( २४ ) विजय दगडू मोरे ( २५ ) अशी ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. यात आदित्य श्रावण शहादेव (२०, रा. आडगांव) हा गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवले. रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.