शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

मित्राच्या भेटीला निघालेल्या दुचाकीस्वाराला वाहनाने उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:16 IST

फोटो जळगाव : मित्राच्या भेटीला जाणाऱ्या विकास भास्कर पाटील (वय ४२, रा.शिवदत्त कॉलनी, जळगाव, मुळ रा.सनफुले, ता.चोपडा) यांच्या दुचाकीला ...

फोटो

जळगाव : मित्राच्या भेटीला जाणाऱ्या विकास भास्कर पाटील (वय ४२, रा.शिवदत्त कॉलनी, जळगाव, मुळ रा.सनफुले, ता.चोपडा) यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने उडविले, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता पाळधी, ता.धरणगाव येथील महामार्गावर घडली.

चोपडा तालुक्यातील सनपुले येथील मुळ रहिवासी असलेले विकास पाटील हे नोकरीच्या निमित्ताने पाच वर्षांपूर्वी जळगाव शहरातील चंदूअण्णा नगर परिसरातील शिवदत्त कॉलनी येथे स्थायिक झाले होते. एमआयडीसीतील सिद्धार्थ कार्बो या कंपनीत ते कामाला होते. मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास विकास पाटील हे बँकेच्या कामानिमित्ताने घराबाहेर पडले. बँकेत काम आटोपून ते दुचाकीने (क्र.एम.एच.१ सी.एल.१८९०) कंपनीतील मित्राला भेटण्यासाठी पाळधीकडे जात होते. तत्पूर्वी त्यांनी पेट्रोलपंपावर दुचाकीत पेट्रोल भरले. पाळधी गावातील साईबाबा मंदिरासमोर महामार्गावर १२.३० वाजता एका भरधाव वाहनाने विकास पाटील यांना चिरडले.

वाहन चालक फरार

अपघातानंतर वाहन चालक पसार झाला होता. दरम्यान, अपघात झाल्याचे लक्षात येताच, नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. विकास पाटील यांच्या कुटुंबीयांना माहिती कळविण्यात येऊन त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोलीस नाईक संदीप पाटील व पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पाटील यांनी पंचनामा केला. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात येऊन शून्य क्रमांकाने हा गुन्हा पाळधी पोलिसात वर्ग केला जाणार आहे. पाटील यांच्यापश्‍चात पत्नी पुष्पांजली, मुलगा तेजस व मुलगी स्नेहल असा परिवार आहे. तेजस याचे शिक्षण पूर्ण झाले असून, तो खासगी कंपनीत नोकरी करतो, तर स्नेहल ही बारावीला शिक्षण घेत आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर सनफुले येथील नातेवाइकांनीही जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.