जामनेरनजीक ट्रकची दुचाकीला धडक शिक्षक ठार, मुख्याध्यापक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 13:44 IST2018-09-22T13:44:09+5:302018-09-22T13:44:22+5:30

मुख्याध्यापक गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी जळगावला हलविण्यात आले

Two-wheeler teacher killed in Jamnarjik truck, headmaster gets seriously injured | जामनेरनजीक ट्रकची दुचाकीला धडक शिक्षक ठार, मुख्याध्यापक गंभीर जखमी

जामनेरनजीक ट्रकची दुचाकीला धडक शिक्षक ठार, मुख्याध्यापक गंभीर जखमी

जामनेर, जि. जळगाव : बेटावद खुर्द, ता.जामनेर येथील शाळेतून दुचाकीने जामनेरकडे येत असलेल्या दुचाकीला भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार शिक्षक प्रमोद वंजारी (वय ३५, रा.जामनेर) हे ठार झाले तर मुख्याध्यापक रोहिदास राठोड गंभीर जखमी आहेत.
हा अपघात जामनेर पासून सात किमी अंतरावर रामवनाजवळ शनिवारी सकाळी अकरा वाजता घडला. अपघातात प्रमोद वंजारी (वय ३५, रा.जामनेर) यांचा उपजिल्हा रुग्णालयात आणत असतांना मृत्यू झाला. मुख्याध्यापक रोहिदास राठोड गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी जळगावला हलविण्यात आले आहे.

Web Title: Two-wheeler teacher killed in Jamnarjik truck, headmaster gets seriously injured