शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 12:10 IST

महामार्गावरील अपघातात इसमाचे दोन्ही पाय निकामी

जळगाव : महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून शुक्रवारी संध्याकाळी पुन्हा एका भरधाव वेगाने जाणाºया वाळूच्या डंपरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत संजय कृष्णा कोळंबे (वय ५०, रा. गुजराल पेट्रोलपंप परिसर, जळगाव) हे गंभीर जखमी झाले. अपघातात त्यांचे दोन्हीही पाय निकामी झाले असून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर कोणीही मदतीला येत नसताना भुसावळ येथून आरोपींना घेऊन येणाºया एमआयडीसी पोलिसांनीच जखमीला पोलीस व्हॅनमधून जिल्हा रुग्णालयात हलविले.महामार्गावर दोन दिवसांपूर्वीच अपघात होऊन एका महिलेला जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी संध्याकाळी पुन्हा दूरदर्शन टॉवरजवळ वाळू वाहतूक करणाºया डंपरने दुचाकीला धडक दिली.पीयूसीसाठी थांबले आणि डंपरने दिली धडकफैजपूर येथे नातेवाईकांकडे लग्न असल्याने ते लग्न आटोपून संजय कोळंबे व त्यांचे शालक महेंद्र भोळे (रा. पुणे) हे दोन्ही जण जळगाव येथे दुचाकीने घराकडे येत होते. त्या वेळी जळगावनजीक असलेल्या दूरदर्शन टॉवरजवळ रस्त्याच्या कडेला पीयूसीचे वाहन दिसल्याने ते दुचाकीच्या पीयूसीसाठी थांबले. त्या वेळी महेंद्र भोळे हे दुचाकीच्या खाली उतरले व कोळंबे हे रस्त्याच्या दुसºया कडेला असलेल्या पीयूसी वाहनाकडे जात असतानाच जळगावकडून भुसावळला वाळू घेऊन जाणाºया डंपरने (क्रमांक एमएच १९, सीवाय - ३१२४) दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की, डंपरने दुचाकीला फरफटत नेले. त्याच वेळी कोळंबे यांच्या पायावरून डंपरचे चाक गेल्याने त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले.पोलीस धावले मदतीलाअपघातानंतर जखमी जागेवर विव्हळत असताना येणारे-जाणारे कोणीही थांबत नव्हते. त्याच वेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार हेमचंद्र झोपे, पोहेकॉ सुनील पाटील, रवींद्र महाले, चालक राजेंद्र पवार हे खुनातील दोन आरोपींना भुसावळ न्यायालयातून जळगाव येथे कारागृहात घेऊन येत होते. त्या वेळी त्यांनी अपघातस्थळी थांबून जखमीला तत्काळ पोलीस व्हॅनमध्ये टाकून जिल्हा रुग्णालयात हलविले.दोन्ही पाय निकामीकोळंबे यांनी डोक्यात हेल्मेट घातलेले होते. त्यामुळे धडकेनंतर ते खाली पडूनही त्यांना इजा झाली नाही. मात्र दोन्ही पायावरून डंपरचे चाक गेल्याने दोन्ही पायाचा चेंदामेंदा झाला. आतील मांस दिसत असल्याने पोलिसांनी जखमीच्या तोंडावर रुमाल बांधून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले.वाळू उठली जीवावरवाळू उपशास बंदी असताना अद्यापही वाळू वाहतूक सुरूच असल्याचे प्रकार समोर येत आहे. त्यात शुक्रवारी वाळू वाहतूक करणाºयाच डंपरने दुचाकीला धडक दिल्याने ही वाळू आली कोठून? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भुसावळ येथे खाजगी बांधकामासाठी ही वाळू नेली जात होती, असे डंपरच्या चालकानेच सांगितले. त्यामुळे वाळू वाहतुकीकडे का डोळेझाक केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.डंपर चालकाही घेतले ताब्यातएमआयडीसी पोलिसांनी जखमीला जिल्हा रुग्णालयात आणत असतानाच डंपरच्या चालकालाही ताब्यात घेऊन त्याला जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत आणले.

टॅग्स :Jalgaonजळगाव