जळगावनजीक कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील माय-लेकी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 12:38 IST2018-06-12T12:38:01+5:302018-06-12T12:38:01+5:30

दुचाकी चालक जखमी

Two-wheeler killer shot dead in containers | जळगावनजीक कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील माय-लेकी ठार

जळगावनजीक कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील माय-लेकी ठार

ठळक मुद्देसकाळीच काळाचा गालारुग्णालयात गर्दी

जळगाव - भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात जळगावातील एकनाथ कॉलनीतील रहिवासी संगीताबाई सुकदेव पाटील (४३) व काजल सुकदेव पाटील (२२) या मायलेकी जागीच ठार झाल्या. हा अपघात ११ जून रोजी सकाळी साडेआठवाजेच्या सुमारास महामार्गावर एकलग्न गावानजीक घडला. यामध्ये सुकदेव ओंकार पाटील (५०) हे जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातानंतर कंटेनर चालक वाहनासह फरार झाल्याची माहिती मिळाली. या वेळी संतप्त झालेल्या गावकºयांनी काहीवेळ रस्ता रोखून धरल्याने महामार्गावर वाहनांच्या लांब रांहगा लागल्या होत्या.
सुकदेव पाटील हे पत्नी संगीताबाई व मुलगी काजल यांच्यासह १० रोजी पारोळा तालुक्यातील कामतवाडी येथे नातेवाईकांकडे गेले होते. तेथून ११ रोजी सकाळी जळगाव येथे येण्यासाठी निघाले असताना त्यांची दुचाकी एकलग्न गावाच्या पुढे आली त्यावेळी मागून येणाºया कंटेनरने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. यामध्ये मायलेकी रस्तावर पडून त्यांच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने त्या जागीच गतप्राण झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. सुकदेव पाटील बाजूला फेकले गेले व त्यांनाही जबर मार लागला.
अपघातानंतर मायलेकींचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. त्यांचा आक्रोश मन हेलावणारा होता.

Web Title: Two-wheeler killer shot dead in containers