नशिराबादजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:32 IST2020-05-06T12:32:03+5:302020-05-06T12:32:15+5:30

नशिराबाद : भादलीकडून कडगाव येथे मोटरसायकलने येत असलेल्या शशिकांत यशवंत सपकाळे (३६, कडगाव) या तरुणाचा अपघात होऊन तो ठार ...

 Two-wheeler killed in accident near Nasirabad | नशिराबादजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार

नशिराबादजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार

नशिराबाद : भादलीकडून कडगाव येथे मोटरसायकलने येत असलेल्या शशिकांत यशवंत सपकाळे (३६, कडगाव) या तरुणाचा अपघात होऊन तो ठार झाला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान शशिकांतचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
रस्त्यावरील खड्डा चुकवताना अचानक मोटरसायकल स्लिप झाल्याने अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ही घटना ४ मे रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास घडली. शशिकांत सपकाळे यांचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झा ल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात नशिराबाद पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, प्रवीण ढाके, किरण बाविस्कर तपास करीत आहे.

Web Title:  Two-wheeler killed in accident near Nasirabad