मालवाहू रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 20:01 IST2020-12-16T20:01:06+5:302020-12-16T20:01:17+5:30
जळगाव : मालवाहू रिक्षाने दुचाकीला धडक दिल्याने संजय यशवंत राणे (५१) हे दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी बी.जे.मार्केट ...

मालवाहू रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
जळगाव : मालवाहू रिक्षाने दुचाकीला धडक दिल्याने संजय यशवंत राणे (५१) हे दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी बी.जे.मार्केट परिसरात घडली. याप्रकरणी बुधवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राणे यांचे बेंडाळे चौकात गोदावरी पेंट हाऊस नावाचे दुकान आहे. १५ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास दुकान बंद करुन ते घरी जेवणसाठी दुचाकीने (क्र.एम.एच १९ बी.एच ३२९६) घरी जायला निघाले असता दुकानापासून हाकेच्या अंतरावर बी.जे.मार्केटजवळ समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू रिक्षाने (क्र.एम.एच १९ एस ९४४१) दुचाकीला धडक दिली. त्यात संजय राणे हे रस्त्यावर फेकले गेल्याने जखमी झाले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात रिक्षाचालक भरत अर्जून बिबे (रा. मोहन नगर टॉकीज जवळ) याच्या विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.