वृक्ष उन्मळून पडल्याने दुचाकी चक्काचूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:07 IST2019-02-25T00:02:00+5:302019-02-25T00:07:50+5:30
जिवीतहानी टळली

वृक्ष उन्मळून पडल्याने दुचाकी चक्काचूर
जामनेर : शहरातील मेनरोडवर असलेल्या बीओटी कॉप्लेक्स जवळील मोठे झाड रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अचानक कोसळले. सुदैवाने याठिकाणी कुणीही नसल्याने जिवीतहानी टळली. मात्र झाडाखाली लावलेल्या दुचाकीचे नुकसान झाले.
दिवसा येथे नागरीकांची वर्दळ असते. काम्ॅप्लेक्सच्या भिंतीला लागूनच उपजिल्हा रुग्णालय असल्याने नागरीकांची ये जा सुरु असते. या ठिकाणी आणखी तीन ते चार जुनी झाडे असून ती काढावी अशी मागणी होत आहे. ही झाडे धोकेदायक बनल्याने भीती व्यक्त केली जात आहे.