शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

जामनेर जवळ दुचाकींचा भीषण अपघात; बापलेकासह तिघांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 00:20 IST

देऊळगावनजीकच या दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात खालीद हा जखमी झाला तर इतर तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.

जळगाव- दोन दुचाकींच्या भीषण धडकेत बाप-लेकासह तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी जवळच्या धामणगाव बढे रस्त्यावर बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात प्रवीण नामदेव माळी वय (४५) व अतुल प्रवीण माळी ( १७, रा. देऊळगाव गुजरी, ता जामनेर) या बाप-लेकासह विलास भगवान गव्हाळ (२८, रा. खेडी पान्हेरा, ता. मोताळा, जि. बुलढाणा) यांचा मृत्यू झाला आहे. 

प्रवीण माळी आणि अतुल माळी हे दुचाकीने देऊळगाव गुजरी गावाकडे येत होते. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या दुचाकीवरील विलास आणि खालीद जमशेद तडवी (रा. रा देऊळगाव गुजरी)  हे दोघे खेडी पान्हेरा गावाकडे जात होते. देऊळगावनजीकच या दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात खालीद हा जखमी झाला तर इतर तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.

विलास हा खालीदकडे पाहुणा म्हणून आला होता. घटना घडली त्या ठिकाणी जंगल परिसर असल्याने  मदत कार्यास अडथळा निर्माण झाला होता. पहूरचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, फत्तेपूर दुरक्षेत्राचे अनिल सुरवाडे, दिनेश मारवळ, प्रवीण चौधरी व किरण शिंपी यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने चारही जणांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणले.  वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तीन जणांना मृत घोषित केले. तर जखमी खालीद तडवी यास  जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगावPoliceपोलिसtwo wheelerटू व्हीलर