बहुळा धरणाजवळ दुचाकी अपघात; १ ठार, ४ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 22:50 IST2021-02-16T22:49:48+5:302021-02-16T22:50:13+5:30
बहुळा धरणावरील पुलाजवळ झालेल्या दुचाकी अपघातात एकजण ठार झाला आहे.

बहुळा धरणाजवळ दुचाकी अपघात; १ ठार, ४ जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचोरा : भरधाव वेगात समोरासमोर दोन मोटारसायकली धडकत मध्येच तिसरी मोटारसायकल येऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर ४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना १५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास पाचोरा -जळगाव राष्ट्रीय महामार्गावर बहुळा धरणावरील पुलाजवळ घडली आहे.
यात बिल्दी, ता. पाचोरा येथील रहिवासी विशाल मनमोहन पाटील (२०) या तरुणाचा मृत्यू झाला आहे तर उर्वरित चार अपघातग्रस्तांना पाचोरा व जळगाव येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. गाडी (एमएच १९ एन २३०३) तर दुसरी गाडी (एमएच१९डीआर २५९२) या दोन दुचाकींचे नुकसान झाले आहे. यामध्ये अपघात झालेल्या जखमींची कुठल्या प्रकारची माहिती अद्याप मिळालेली नसून अपघातात मृत्यू झालेले विशाल पाटील यांना त्यांचे काका शशिकिरण पाटील यांनी पाचोरा रुग्णालयात घेऊन गेले असता वैद्यकीय अधिकारी साळुंखे यांनी मयत घोषित केले होते.