चोरीच्या आठ दुचाकींसह दोघांच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 16:26 IST2020-09-21T16:26:05+5:302020-09-21T16:26:24+5:30

एलसीबीची कारवाई : दोन ठिकाणी गुन्हे दाखल

The two were caught with eight stolen bikes | चोरीच्या आठ दुचाकींसह दोघांच्या मुसक्या आवळल्या

चोरीच्या आठ दुचाकींसह दोघांच्या मुसक्या आवळल्या


जळगाव : जिल्ह्यातील विविध भागातून आठ दुचाकी चोरणाऱ्या राहुल माधवराव वाघ (रा.भडगाव) आणि रविंद्र तुकाराम चौधरी (२५, रा.पारोळा ह.मु.पाचोरा ) दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आठ दुचाकींसह सोमवारी अटक केली आहे. या गुन्हेगारावर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील भडगाव आणि धरणगाव तालुक्यातील पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यात मोटारसायकली चोरुन नेल्याप्रकरणी संशयित आरोपी राहुल माधवराव वाघ आणि रवींद्र तुकाराम चौधरी ( यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे दाखल झाल्यापासून दोन्ही संशयित आरोपी फरार होते. दोघांनी एरंडोल, पाचोरा आणि पारोळा तालुक्यातून एकुण ३ लाख ५५ हजार रुपये किंमतीच्या ८ दुचाकी चोरुन नेल्यात. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोघांना चोरी केलेल्या दुचाकींसह अटक करण्यात आली आहे.

यांनी केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेश मेढे, संजय हिवरकर, दत्तात्रय बडगुजर, रामकृष्ण पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, किरण चौधरी, इंद्रिस पठाण, राजेंद्र पवार यांनी ही कारवाई केली. पुढील कारवाईसाठी दोघांना धरणगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Web Title: The two were caught with eight stolen bikes