कोळशाने भरलेल्या दोन ट्रकची महामार्गावर समोरासमोर धडक, दोघं चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 13:32 IST2018-09-02T13:27:53+5:302018-09-02T13:32:42+5:30
नशिराबादनजीक अपघात

कोळशाने भरलेल्या दोन ट्रकची महामार्गावर समोरासमोर धडक, दोघं चालक ठार
नशिराबाद, जि. जळगाव : भरधाव वेगाने जाणाऱ्या कोळशाने भरलेल्या दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन स्वरुप चमरु इनवते (२७, रा. सुरला, जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश) व कमीत दुर्वीस सिंघाभाई (रा. बाजार थालिया, जि. सुरत, गुजरात) हे दोघंही चालक ठार झाले. हा अपघात रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नशिराबादनजीक एका वळणार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथून सुरतकडे कोळसा घेऊन जाणारा ट्रक भरधाव वेगाने चुकीच्या दिशेने जात असताना समोरुन सुरत येथून नागपूरकडे कोळसा घेऊन येणाºया ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की, दोन्ही ट्रकचा चक्काचूर झाला.
पाच तास वाहतूक ठप्प
अपघातानंतर महामार्गावर वाहतूक ठप्प होऊन दोन्ही बाजूला अडीच ते तीन कि.मी. पर्यंत लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी साडेआठ वाजता वाहतूक सुरळीत झाली.