वादळात झाड कोसळून अंचालवाडी येथे दोघं बहिणींचा दाबल्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 15:50 IST2021-05-16T15:48:51+5:302021-05-16T15:50:50+5:30

अंचलवाडी येथे वादळामुळे गावाबाहेरील खळ्यात चिंचेचे झाड कोसळून झोपडी दाबली जाऊन दोन बहिणीचा दबल्याने मृत्यू झाला आहे.

Two sisters die after crushing a tree in Anchalwadi | वादळात झाड कोसळून अंचालवाडी येथे दोघं बहिणींचा दाबल्याने मृत्यू

वादळात झाड कोसळून अंचालवाडी येथे दोघं बहिणींचा दाबल्याने मृत्यू

ठळक मुद्देअमळनेरात वादळ आणि पाऊस सुरु.

लाेकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : तालुक्यातील अंचलवाडी येथे वादळामुळे गावाबाहेरील खळ्यात चिंचेचे झाड कोसळून झोपडी दाबली जाऊन दोन पावरा समाजाच्या बहिणीचा दबल्याने मृत्यू झाला आहे.

रणाईचे येथे राजेंद्र भीमराव पाटील यांच्या शेतात सालदरकी करण्यासाठी आलेल्या बल्लू बारेला याने गावाबाहेर खळ्यात स्वतःची झोपडी तयार केली होती.  १६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक जोरात वादळ आणि पाऊस सुरू झाला. काही कळण्याच्या आत खळ्यात असलेले चिंचेचे झाड कोसळले. त्यात बल्लूची झोपडी दाबली गेली. त्याची मोठी मुलगी ज्योती बारेला (१६) आणि रोशनी बारेला (१०) या दोन्ही बहिणी झाडाखाली दाबल्या जाऊन त्यांचा मृत्यू झाला.

ताबडतोब गावातील सरपंच भगवान बवल पाटील , रंगराव पाटील , गोपाळ मुरलीधर पाटील यांच्यासह गावातील ग्रामस्थ तरुण मदतीला धावून आले. संपूर्ण घर दाबले गेल्याने झाड कापून मुलींना व घरचे समान काढण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Two sisters die after crushing a tree in Anchalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.