कोळगाव पोलीस चौकी समोरचे दोन दुकाने फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 21:52 IST2018-09-05T21:51:23+5:302018-09-05T21:52:45+5:30

कोळगाव येथील पोलीस चौकीसमोर असलेल्या रेवती इलेक्ट्रॉनिक आणि मयुर कापड दुकान व दुध डेअरी याठिकाणी घरफोडी करीत चोरट्यांनी ऐवज लंपास केला.

Two shops were set up in front of the Kolgaon police post | कोळगाव पोलीस चौकी समोरचे दोन दुकाने फोडले

कोळगाव पोलीस चौकी समोरचे दोन दुकाने फोडले

ठळक मुद्देनागरिकांनी दिले पोलिसांना निवेदनपोलीस चौकी फक्त नावालाचएक दुकान दोन वर्षात तीन वेळा फोडले

गुढे, ता.भडगाव : कोळगाव येथील पोलीस चौकीसमोर असलेल्या रेवती इलेक्ट्रॉनिक आणि मयुर कापड दुकान व दुध डेअरी याठिकाणी घरफोडी करीत चोरट्यांनी ऐवज लंपास केला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एक दुकान चोरट्यांनी दोन वर्षात तीन वेळा फोडले आहे.
चोरट्यांनी कापडाच्या दुकानातून रेडीमेड ड्रेस, साड्या चोरुन नेल्या आहेत. रेवती इलेक्ट्रॉनिक या दुकानातून एक मोबाईल गायब केला आहे. या दुकानात चोरट्यांनी दोन वर्षात दोन वेळा घरफोडी केली आहे. दोन्ही दुकाने हे पोलीस चौकीपासून जवळच आहे.
गावातील पोलीस चौकी नावालाच आहे. याठिकाणी पोलीस राहत नसल्याने दूरक्षेत्रातील १५ गावांची सुरक्षा रामभरोसे आहे. रात्री अपरात्री वाद झाल्यास नागरिकांना भडगाव पोलीस स्टेशनला जावे लागते. पोलीस गस्तीवर राहत नसल्याने गावात गुन्हेगारी कारवाया वाढल्या आहेत.
चोरी झाल्याची घटना उघड झाल्यानंतर व्यापारी व नागरिकांनी पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे व तहसीलदार सी.एम.वाघ यांना निवेदन देत चोरट्यांना पकडण्याची मागणी केली.या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, साहाय्यक निरीक्षक रवींद्र जाधव करीत आहेत.

Web Title: Two shops were set up in front of the Kolgaon police post