जळगाव कारागृहातून दोन कैदी पळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 15:51 IST2018-12-05T15:38:53+5:302018-12-05T15:51:45+5:30

जळगाव येथील जिल्हा कारागृहातून बुधवारी (5 डिसेंबर) दोन कैदी पळाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Two prisoners escaped from Jalgaon jail | जळगाव कारागृहातून दोन कैदी पळाले

जळगाव कारागृहातून दोन कैदी पळाले

ठळक मुद्देजळगाव येथील जिल्हा कारागृहातून बुधवारी (5 डिसेंबर) दोन कैदी पळाल्याची घटना समोर आली आहे.जामनेर तालुक्यातील बिलवडी येथील शेषराव सुभाष सोनवणे (28) आणि बोदवड येथील रविंद्र भिमा मोरे हे दोन कैदी कारागृहातून पळाले.स्वयंपाक घराच्या भिंतीवरुन उडी मारून या दोन कैद्यांनी संधी साधून पळ काढला. 

जळगाव -  जळगाव येथील जिल्हा कारागृहातून बुधवारी (5 डिसेंबर) दोन कैदी पळाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील बिलवडी येथील शेषराव सुभाष सोनवणे (28) आणि बोदवड येथील रविंद्र भिमा मोरे हे दोन कैदी कारागृहातून पळाले आहेत.

सोनवणे आणि मोरे या दोघांना चोरीच्या आरोपाखाली दाखल असलेल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत कैदी म्हणून 4 सप्टेंबर 2018 रोजी जिल्हा कारागृहात दाखल करण्यात आले होते. स्वयंपाक घराच्या कामाची जबाबदारी या दोघांवर होती. मात्र सकाळी साडे पाच वाजता बराकीतून या दोघांना बाहेर काढण्यात आले. थोडा वेळ काम केल्यानंतर स्वयंपाक घराच्या भिंतीवरुन उडी मारून या दोन कैद्यांनी संधी साधून पळ काढला. 

Web Title: Two prisoners escaped from Jalgaon jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.