पाचोऱ्यात पुराच्या पाण्यात बुडून निवृत्त सैनिकासह दोघांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 18:50 IST2024-10-14T18:50:00+5:302024-10-14T18:50:17+5:30

निवृत्त जवानासह दोन जणांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. 

Two people including a retired soldier died after drowning in flood waters in Pachora  | पाचोऱ्यात पुराच्या पाण्यात बुडून निवृत्त सैनिकासह दोघांचा मृत्यू 

पाचोऱ्यात पुराच्या पाण्यात बुडून निवृत्त सैनिकासह दोघांचा मृत्यू 

संजय सोनार/ नगरदेवळा (जि. जळगाव)  :  पाचोरा आणि भडगाव तालुक्याला परतीच्या पावसाने रविवारी रात्री पुन्हा तडाखा दिला. यामुळे सोमवारी सकाळी नगरदेवळा (ता. पाचोरा)  येथील बाजारपेठेत पाणी शिरले. यात निवृत्त जवानासह दोन जणांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. 

यात सीमा सुरक्षा दलातील निवृत्त जवान रवींद्र प्रभाकर पाटील (४०) आणि राजेंद्र गोरख पाटील (३८, दोघे रा. नगरदेवळा, ता. पाचोरा) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.  पहाटे नगरदेवळा या गावातून वाहणाऱ्या अग्नावती नदीला पूर आला होता.  त्यावेळी बाजारातील साहित्य आवरतांना पुराचा लोंढा आल्याने हे दोघे वाहून गेले आणि काही अंतरावर असलेल्या झुडुपांमध्ये दोघांचा मृतदेह आढळून आला.

Web Title: Two people including a retired soldier died after drowning in flood waters in Pachora 

टॅग्स :Jalgaonजळगाव