मुंबईची प्रेयसी, जामनेरला दोघांनी केला प्रेमविवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 23:26 IST2021-03-24T23:26:13+5:302021-03-24T23:26:37+5:30
मुंबई येथून घराबाहेर पडलेली तरुणी जामनेर शहरात आढळून आली.

मुंबईची प्रेयसी, जामनेरला दोघांनी केला प्रेमविवाह
लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर : मुंबई येथून घराबाहेर पडलेली तरुणी शहरात आढळून आली असून तिने प्रियकरासोबत विवाह केल्याची घटना उघडकीस आली.
मुंबईच्या तरुणीचे जामनेर येथील तरुणाशी प्रेम जुळल्याने तिने तीन दिवसांपूर्वी मुंबई सोडली व थेट जामनेर गाठले. तिकडे मुलगी घर सोडून गेल्याने पालकांची चिंता वाढली. त्यांनी हरविलाची तक्रार दाखल केली होती. मुलगी जामनेरला असल्याची माहिती समजताच पालकांनी सोमवारी पोलीसांशी संपर्क साधला.
पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी तपासासाठी पोलीसाना शहरात पाठवले असता त्यांना मंगळवारी ती तरुणी एका घरात आढळून आली. तिला पोलीस ठाण्यात आणले असता तिने आपण स्वेच्छेने लग्न केल्याचे सांगत पालकांसोबत जाण्यास नकार दिला.
तरुणीस आईने समजवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला; पण आंधळ्या प्रेमात डुंबलेल्या मुलीपुढे तिला माघार घ्यावी लागली. पोलिसांनी पालकांचे जबाब नोंदवून घेतले.