बोदवडजवळ भरधाव कंटेनरच्या धडकेत दोन बालिका ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 19:26 IST2018-09-28T19:24:39+5:302018-09-28T19:26:27+5:30
बोदवडपासून जवळच असलेल्या शेलवड घाटीजवळ भरधाव कंटेनरने दुचाकीला शुक्रवारी संध्याकाळी धडक दिली.

बोदवडजवळ भरधाव कंटेनरच्या धडकेत दोन बालिका ठार
बोदवड, जि.जळगाव : बोदवडपासून जवळच असलेल्या शेलवड घाटीजवळ भरधाव कंटेनरने दुचाकीला शुक्रवारी संध्याकाळी धडक दिली. त्यात अवनी निकम (वय-७) व अनन्या निकम (वय-५) या दोन बालिका जागीच ठार झाल्याची घटना घडली.
बोदवड तालुक्यातील भानखेड येथील दशरथ निकम यांची पत्नी मनीषा दशरथ निकम या शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास तालुक्यातील शेलवड येथून भानखेडा येथे भाऊ पवन सुकाळे सोबत दुचाकीवर निघाल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मुलगी अवनी दशरथ निकम व अनन्या दशरथ निकम या होत्या. दुचाकी शेलवड घाटी जवळ आल्यानंतर भरधाव कंटेनरने धडक दिली. त्यात अवनी व अनन्या या दोन्ही बालिका जागीच ठार झाल्या. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बोदवड पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.