पारोळा बस स्थानकात मंगलपोत चोरताना दोन महिला चोरट्यांना रंगेहात पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 21:44 IST2020-12-27T21:44:00+5:302020-12-27T21:44:50+5:30
बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत दोन महिलांनी मंगळसूत्र चोरून पळत असताना पोलिसांनी पाठलाग करून पकडून ताब्यात घेतले.

पारोळा बस स्थानकात मंगलपोत चोरताना दोन महिला चोरट्यांना रंगेहात पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : येथील बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत दोन महिलांनी मंगळसूत्र चोरून पळत असताना पोलिसांनी पाठलाग करून पकडून ताब्यात घेतले.
रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शोभा मनोहर महाजन (विखरण, ता. एरंडोल) हे अमळनेर येथे जाण्यासाठी आले असता फलाट क्रमांक ३ वर लागलेल्या बसमध्ये चढत असताना या गर्दीचा फायदा घेत शोभा महाजन यांच्या गळ्यातील सात ग्रॅमचे मंगल पोत व सोन्याचे मणी असलेली मंगल पोत राधिका चंदर चव्हाण (१९), मीना उर्फ रेखा चव्हाण (६५ , अस्नाबाद, ता. भोकरदन) यांनी पोत चोरल्याचे कळले. त्यांनी आरडाओरड केली.
दोन महिला पोत चोरून पळ काढत असताना घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीसंच्या निर्दशनास आले. उपस्थित पोलीस कॉन्स्टेबल किशोर भाई, सुनिता शिंपी, दीपक आहिरे, सोमनाथ दुसाने यांनी मंगलपोत पळवून नेणार्या महिलेचा पाठलाग करून रंगेहात पकडले. याबाबत शोभा मनोहर महाजन यांनी फिर्याद दिल्यावरून दोघीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे