अतिक्रमण काढण्यास विरोध करणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 14:28 IST2020-09-22T14:28:23+5:302020-09-22T14:28:42+5:30

जळगाव - घाणेकर चौकात महापालिकेच्या अतिक्रमण पथकाशी हुज्जत घालणाऱ्या दोघं हॉकर्सवर गुन्हा दाखल होऊन त्यांना मंगळवारी 22 रोजी अटक ...

Two arrested for opposing encroachment removal | अतिक्रमण काढण्यास विरोध करणाऱ्या दोघांना अटक

अतिक्रमण काढण्यास विरोध करणाऱ्या दोघांना अटक

जळगाव - घाणेकर चौकात महापालिकेच्या अतिक्रमण पथकाशी हुज्जत घालणाऱ्या दोघं हॉकर्सवर गुन्हा दाखल होऊन त्यांना मंगळवारी 22 रोजी अटक करण्यात आली आहे. शेख फारूक शेख यासिन व तौफिक शेख फारूक असे अटक झालेल्यांची नावे आहेत.

होर्डिंगसह शहरातील शनीपेठ भागातील अनधिकृत अतिक्रमण काढण्याची मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. यावेळी काही हॉकर्सने मनपा कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. यामुळे याठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर 8 हॉकर्सचे साहित्य जप्त करण्यात आले. तरीही काही जणांकडून विरोध कायम होता. वाद वाढत असताना याबाबत पोलिसांना देखील सूचना देण्यात आल्या. यावेळी शेख फारूक शेख यासिन व तौफिक शेख फारूक यांनीही मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना आणि पोलिसाला शिवीगाळ करीत सरकारी कामात अडथळा आणला. दरम्यान वाद घालणाऱ्य दोघांवर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्याद ज्ञानेश्वर तुकाराम कोळी या मनपाच्या कर्मचाऱ्याने दिली आहे. त्यानुसार मंगळवारी शेख फारूक, तौफिक या दोघांना शनीपेठ पोलिसांनी अटक केली आहे. कोरोनाच्या काळात मनपाने शहरात होर्डिंग्ज लावण्यात कोणतीही परवानगी दिली नसतानाही शहरात लावण्यात आलेले होर्डिंग्ज मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून काढण्यात आले. तसेच जाहिरात करणाऱ्यांना मनपाकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत.

Web Title: Two arrested for opposing encroachment removal