जळगावात महामार्गावर ट्रक, कार, दुचाकीचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 12:53 IST2018-11-12T12:51:18+5:302018-11-12T12:53:49+5:30

जळगाव : महामार्गावर अग्रवाल हॉस्पिटल चौकात रविवारी सायंकाळी साडे सात वाजता ट्रक, कार व दुचाकी या तीन वाहनांचा विचित्र ...

Truck, car, bike accident on Jalgaon highway | जळगावात महामार्गावर ट्रक, कार, दुचाकीचा अपघात

जळगावात महामार्गावर ट्रक, कार, दुचाकीचा अपघात

जळगाव : महामार्गावर अग्रवाल हॉस्पिटल चौकात रविवारी सायंकाळी साडे सात वाजता ट्रक, कार व दुचाकी या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. त्यात तीन जण जखमी झाले आहेत. या तिन्ही जखमींना वेगवेगळ्या खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे महामार्गावर कोंडी झाली होती.
विद्यार्थिनी जखमी
आकाशवाणी चौकाकडून धुळ्याकडे भरधाव वेगाने जाणारा ट्रक अग्रवाल हॉस्पिटल चौकात पुढे चालणाऱ्या कारवर आदळला. त्यामुळे ही कार पुढे चालणाºया दुचाकीवर धडकली. या विचित्र अपघातात कारमधील वैशाली पंडीत वळवी (वय २३, रा. चोरविहार, पो.खडकी, ता.जि.नंदुरबार) ही विद्यार्थिनी व दुचाकीवरील सदानंद नारायण महाले (वय ३९) व स्वाती सदानंद महाले (वय ३४) दोन्ही रा.ईश्वर कॉलनी, जळगाव हे दाम्पत्य जखमी झाले. महाले दाम्पत्य दुचाकीने खोटे नगरातील नातेवाईकाकडे जात होते.

Web Title: Truck, car, bike accident on Jalgaon highway