शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
2
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
3
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
5
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
6
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
7
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
9
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
10
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
12
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
13
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
14
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
15
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
16
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
17
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
18
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
19
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 
20
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर

मोटारसायकलला जोडली ट्रॉली, शिक्षक मुलांना शाळेत नेतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2022 9:27 AM

Deshi jugad News: आधी कोरोनामुळे बस बंद, आता कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बंद, यामुळे  विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यावर टेहू येथील आयटीआयचे शिक्षक एम. व्ही. पाटील  यांनी उपाय शोधून काढला आहे.

- शरद पाटील पारोळा (जि. जळगाव) : आधी कोरोनामुळे बस बंद, आता कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बंद, यामुळे  विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यावर टेहू येथील आयटीआयचे शिक्षक एम. व्ही. पाटील  यांनी उपाय शोधून काढला आहे. आपल्या मोटारसायकलला ट्रॉली जोडून ते विनामूल्य विद्यार्थ्यांना शाळेत नेतात. बस बंदमुळे शहरी भागात शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ज्या पालकांकडे वाहन आहे,  ते मुलांना शाळेत नियमित पाठविण्याचा प्रयत्न करतात. शिक्षक पाटील  हे दगडीसबगव्हाण ते टेहू रोज मोटारसायकलने प्रवास करतात.  त्यांना  वाहनाची वाट पाहणारे अनेक विद्यार्थी रस्त्याच्या कडेला उभे असलेले दिसायचे. ते पाहून पाटील यांना कल्पना सुचली. त्यांनी १० क्विंटल वजन ओढू शकेल, अशी चार टायरची ट्रॉली बनविली आणि ती मोटारसायकलला जोडली. शाळा उघडल्यापासून ते रोज १० ते १२ विद्यार्थ्यांना या ट्रॉलीत बसवून पारोळा येथे शिकवणी व शाळेच्या कामासाठी सोडतात. संध्याकाळी जाताना त्यांना परत घेऊन जातात. दगडीसबगव्हाण गाव हे पारोळा-धरणगाव रस्त्यावर ५ किमी आतमध्ये आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना इतर वाहन मिळणेही अवघड असते. या स्थितीत पाटील यांनी बनवलेली ट्रॉली त्यांना शिक्षणासाठी वरदान ठरली आहे. 

समाजातील इतर बांधवांनीही रस्त्यावर वाहनाची वाट बघत असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या वाहनावर जागा देऊन सहकार्य करावे. म्हणजे त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. - एम. व्ही. पाटील, शिक्षक

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेJalgaonजळगावTeacherशिक्षक