शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

इटारसीजवळ रेल्वे रुळावर झाडे कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:12 IST

भुसावळ : मध्यप्रदेशात गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे मध्य रेल्वेतील इटारसीजवळ रेल्वे रुळांवर अनेक झाडे पडली. विद्युत तारा ...

भुसावळ : मध्यप्रदेशात गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे मध्य रेल्वेतील इटारसीजवळ रेल्वे रुळांवर अनेक झाडे पडली. विद्युत तारा तुटल्या. विद्युत खांब वाकले. परिणामी हावडा, ताप्ती गंगा, एक्स्प्रेससह इतर गाड्या उशिराने धावत आहेत.

पश्चिम मध्य रेल्वेच्या जबलपूर विभागात गुर्रा-बगरतवा स्टेशनदरम्यान झालेल्या वादळामुळे अनेक झाडे रेल्वे रुळावर पडली. याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. अप-डाऊन रेल्वे वाहतूक दोन्ही ट्रॅकवर थांबली होती. ताप्ती गंगा एक्स्प्रेस, हावडा, काशी, राप्ती सागर, गौहाटी, छपरा, साकेत, मंडुआडिह, पाटलीपुत्र, महानगरी एक्स्प्रेससह इतर गाड्यांची चाके थांबली. या गाड्या गुरुरा, बगरतवा, सोनतलाई, सोहागपूर, इटारसीसह अन्य स्थानकांवर उभ्या केल्या आहेत. इटारसी आणि पिपरिया रेल्वेस्थानकांवरून टॉवर व्हॅन दुरुस्तीच्या कामासाठी निघाली. गुर्रा-बगरतवादरम्यान ओएचई वायरवर बरीच झाडे पडल्याचे वृत्त आहे.

तसेच भुसावळ स्थानकावर येणाऱ्या गाड्यांच्या विलंबाची परिस्थिती शुक्रवारी रात्रीपर्यंत राहणार आहे. ०८६०९ अप, रांची-लो.टि. टर्मिनस रांची एक्स्प्रेस, ८.३० तास उशिरा धावत आहे. ०२१९४ अप, वाराणसी-मुंबई महानगरी एक्स्प्रेस, ५.४० तास उशिरा धावत आहे. ०२३२१ अप, हावडा-मुंबई कलकत्ता मेल, ५.२५ तास उशिरा धावत आहे. ०२१४२ अप, पाटलीपुत्र- लो. टि. टर्मिनस पाटलीपुत्र सुपरफास्ट एक्स्प्रेस, सहा तास उशिरा धावत आहे. ०२१६८ अप, मंडुआडिह-लो. टि. टर्मिनस वाराणसी सुपरफास्ट एक्स्प्रेस, ५.४० तास उशिरा धावत आहे. ०१०६८ अप, फैजाबाद-लो. टि. टर्मिनस साकेत एक्स्प्रेस, अडीस तास उशिरा धावत आहे. ०१०६० अप, छपरा-लो. टि. टर्मिनस छपरा एक्स्प्रेस, सात तास उशिरा धावत आहे. ०९१४८ अप भागलपूर- सुरत भागलपूर एक्स्प्रेस, १.१५ तास उशिरा धावत आहे. ०५०१८ अप गोरखपूर-लो. टि. टर्मिनस काशी एक्स्प्रेस, अडीच तास उशिरा धावत आहे. ०५६४६ अप गौहाटी- लो. टि. टर्मिनस गौहाटी एक्स्प्रेस, १.१५ तास उशिरा धावत आहेत.

रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. त्यामुळे झाडे व झाडाच्या फांद्या रेल्वे रुळावर पडल्या. ओव्हरहेड इलेक्ट्रिकल (ओएचई) लाइनदेखील खराब झाली आहे. गुरुवारी सायंकाळी ४.४८ पासून रेल्वे ट्रॅक बंद आहे. इटारसी-पिपरिया रेल्वेस्थानकादरम्यान रेल्वे वाहतूक तीन तास बंद ठेवण्यात आली होती. रेल्वे टॉवर व्हॅनची टीम सुधारण्याचे काम करीत आहे. शुक्रवारी दुपारी बारा वाजेपर्यंत रेल्वे कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर मुंबई व दिल्ली मार्गावरील रेल्वे मार्ग सुरळीत करण्यात आले.