शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

शॉक लागलेल्या गारखेड्याच्या तरुणाचा डॉक्टर नसल्याने उपचाराअभावी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 22:37 IST

सदोष मनुष्यावधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी : नागरिकांचे रास्तारोको आंदोलन

धरणगाव : तालुक्यातील गारखेडा येथील वीसवर्षीय तरुणाला १९ रोजी सकाळी विद्युत तारांचा शॉक लागला. त्यास उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता तेथे डॉक्टर नसल्याने त्या तरुणाचा उपचाराअभावी तडफडत मृत्यू झाला.या तरुणाला वेळीच उपचार मिळाला असता तर त्याचे प्राण वाण वाचले असते अशा संतप्त भावना व्यक्त करीत येथील सर्वपक्षीय पदाधिकारी व गारखेडा ग्रामस्थांनी उड्डाण पुलाजवळ रास्तारोको आंदोलन केले. तसेच दांडीबहाद्दर डॉक्टरांविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तब्बल दीड ते दोन तास झालेल्या या रास्ता रोकोमुळे एक किमीपर्यंत वाहतूक खोळंबली होती. तहसिलदार व पोलीसांनी वेळीच आंदोलनकर्त्यांची समजूत काढून लेखी आश्वासन दिल्याने वातावरण निवळले.मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास गारखेडा येथील विलास कैलास पाटील (वय २०) या युवकाला सुकलेले कपडे काढत असताना विद्युत तारांचा शॉक लागला. त्याला तत्काळ त्याच्या भावाने धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले. परंतु या ठिकाणी एकही डॉक्टर नसल्याने त्याच्यावर वेळेवर उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे तडफडत त्याचा मृत्यू झाला. यावेळी संतप्त गावकऱ्यांनी व शहरातील राजकीय पदाधिकाऱ्यांनी एक ते दीड तास रुग्णालयाबाहेर रास्ता रोको आंदोलन केले.कर्तव्यावर गैरहजर आसलेल्या डॉक्टराविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही, असा पवित्रा घेतला होता.चौकशीसाठी सी.एस.दाखल...या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण, आरएमओ डॉ.सुनिल बन्सी हे तातडीने दाखल झाले. त्यांनी तहसिलदार नितीनकुमार देवरे, सपोनि हनुमंत गायकवाडे आदींशी चर्चा केली. गैरहजर डॉक्टरविरुध्द कारवाई व वीज कंपनीकडून भरपाई मिळण्यासाठीचा प्रस्ताव तहसिलदारांनी तयार करुन सी.एस.ला दिला व जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला. डॉ.गिरीष चौधरी यांना निवासस्थानी राहणे बंनकारक असताना ते का थांबत नाहीत, यावरही चर्चा झाली.