जळगाव- विशेष पोलीस महानिरीक्षक अश्वती दोरजे यांनी मंगळवारी नाशिक परिक्षेत्रातील १७ पोलीस निरीक्षक व १९ सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या. यात जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांची नाशिक ग्रामीण, जळगाव शहरचे धनंजय येरुळे यांची धुळे, भिमराव नांदूरकर यांची अहमदनगर येथे बदली झाली. तर सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे यांना एक वर्ष स्थगिती मिळाली आहे. नाशिक ग्रामीणमधून प्रतिनियुक्तीने जळगावात आलेले कांतिलाल पाटील यांची जळगावला नियमित बदली झाली आहे.
सहायक पोलीस निरीक्षकांमध्ये नियंत्रण कक्षाचे सचिन बेंद्रे व हनुमान गायकवाड यांची धुळे, फैजपूर येथील प्रकाश वानखेडे यांची नंदूरबार, जामनेरचे राजेश काळे यांची अहमदनगर, प्रकाश सदगीर यांना एक वर्ष स्थगीती मिळाली आहे. चोपड्याचे संदीप आराक यांची नंदूरबार, रवींद्र बागुल यांची अहमदनगर येथे बदली झाली आहे. नाशिक ग्रामीण येथून गणेश गुरव, जालींदर पळे, आशिषकुमार अडसूळ, मच्छींद्र दिवे, धुळे येथून रमेश चव्हाण व अहमदनगर येथून दिलीप राठोड यांची जळगावाला बदली झाली आहे.