शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

पर्यटनस्थळ पडले ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 3:57 PM

तीन महिन्यांपासून शुकशुकाट : वनसमितीला उत्पन्न मिळेना

हरताळा, ता. मुक्ताईनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने २२ मार्च पासून सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केली. इतर व्यवहार हळूहळू सुरळीत झाले मात्र पर्यटनस्थळे अद्यापही ओस पडली आहेत.वनविभागाच्या हद्दीत येणारे हरताळा येथील श्री चक्रधर स्वामी पर्यटन स्थळ, शिवशक्ती मंदिर, मातृपितृ भक्त श्रावण बाळ समाधी मंदिर आदी स्थळी नेहमीच गर्दी होते. मात्र संसर्गाच्या भितीने पर्यटकांनी या निसर्गरम्य स्थळीही पाठ फिरवली आहे.उन्हाळ्यात देखील अनेक पर्यटक या नयनरम्य ठिकाणाला भेट देत असतात. शैक्षणिक सहलींसह नागरिकही कुटुंबासह येतात. यंदा मात्र भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या शून्यावर आली आहे. पर्यटन स्थळावर व देवालय असून तेथेही शुकशुकाट पहावयास मिळत आहे. येथे असलेले विविध पक्षी, वन्य प्राणी आदी दुर्बिणीद्वारे पाहण्याचा आनंद अनेक जण लुटत असतात. यंदा तलावाला उन्हाळ्यात देखील चांगले पाणी असल्याने अधिकच मोहक वाटत होते.पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांना अनेक सुविधा येथे उपलब्ध आहेत. पावसाळा सोडला तर वर्षभर येथे पर्यटक व भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत होते. मात्र मागील तीन महिन्यापासून पर्यटन लॉकडाऊन असल्यामुळे या पर्यटन स्थळावरही पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळाला. आता देवाला या संदर्भात देखील उघड दार देवा आता उघड दार देवा... अशी म्हणण्याची वेळ आली आहे.विविध कामांना लागला ‘ब्रेक’हरताळे येथील ही विविध मंदिरे व हा निसर्गरम्य परिसर वनविभागाच्या हद्दीत येतो. यापरिसराची देखभाल व विकास करण्याच्या दृष्टीने वनपाल यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांची वनसमिती स्थापन केली आहे. या ठिकाणी येणाºया पर्यटकांकडून वनसमितीचे सदस्य शुक्ल आकारतात. याची पावतीही दिली जाते. दरम्यान जमा झालेल्या पैशातून झाडे लावणे, साफसफाई, उद्यान देखभाल आदी विविध कामे केली जातात. मात्र सध्या काहीच उत्पन्न नसल्याने ही विविध कामेही थांबली आहेत.