‘लोकमत’ जळगाव आवृत्तीचा आज ४२ वा वर्धापन दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 12:22 IST2019-12-15T12:22:09+5:302019-12-15T12:22:31+5:30
वाचक व हितचिंतकांच्या स्वागतासाठी सजले ‘लोकमत भवन’

‘लोकमत’ जळगाव आवृत्तीचा आज ४२ वा वर्धापन दिन
जळगाव : वाचकांचे प्रेम आणि विश्वासाच्या बळावर ‘लोकमत’चा ४२ वा वर्धापन दिन रविवार, १५ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. या निमित्ताने वाचक व हितचिंतकांच्या स्वागतासाठी ‘लोकमत भवन’मध्ये सायंकाळी ६ वाजता स्रेहसोहळा आयोजित करण्यात आला आहे.
‘लोकमत’च्या एमआयडीसी कार्यालयात रविवारी सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळात स्रेहसोहळा होणार आहे. वाचक, हितचिंतक व स्नेहीजनांनी आवर्जून सहभागी व्हावे, कृपया पुष्पगुच्छ व भेटवस्तू आणू नये, असे आवाहन ‘लोकमत’ परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.
खान्देशशी ‘लोकमत’ची नाळ जुळून चार दशकांहून अधिक काळ लोटला आहे. समाज जीवनात स्थित्यंतरे घडली. खान्देशी माणसाच्या मनातला ओलावा आणि ‘लोकमत’मधील खान्देशविषयीची आस्था, स्रेह वृध्दिंगत होत राहिला.
ही सुखद आणि आश्वासक वाटचाल केवळ आपल्या सारख्या सुहृदांच्या स्रेह व पाठिंब्यामुळे शक्य झाली आहे.
वर्धापनदिनानिमित्त विशेषांक प्रसिद्ध करण्यात आले असून त्यात जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रात झालेले बदल, प्रगती तसेच तंत्रज्ञानामुळे झालेले परिवर्तन याची प्रातिनिधीक स्वरुपात माहिती देण्यात आली आहे.