खळबळजनक : मुक्ताईनगर तालुक्यात थेरोळा गावालगत मृतावस्थेत आढळला पट्टेदार वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 13:27 IST2018-08-12T13:23:31+5:302018-08-12T13:27:37+5:30
घातपात आहे की वाघाचा नैसर्गिक मृत्यू आहे, या बाबत शंका उपस्थित केल्या जात आहे

खळबळजनक : मुक्ताईनगर तालुक्यात थेरोळा गावालगत मृतावस्थेत आढळला पट्टेदार वाघ
जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यात रविवारी पुन्हा एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला आहे. हा घातपात आहे की वाघाचा नैसर्गिक मृत्यू आहे, या बाबत शंका उपस्थित केल्या जात आहे. दरम्यान, मुक्ताईनगर तालुक्यातच चार महिन्यांपूर्वी केळीच्या बागेत एका वाघीणीचा मृत्यू झाल्यानंतर आता पुन्हा ़या घटनेने खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यात थेरोळा गावालगतच्या पूर्णा नदीपात्रात रविवारी सकाळी एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. या वाघाच्या पायाला ठिबकच्या नळ््या बांधलेल्या असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वढोडा वनक्षेत्राधिकारी व त्यांचे सहकारी घटनास्थली रवाना झाले आहेत.