शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

30 हजार क्विंटलपेक्षा अधिक तूर व्यापा:यांच्या घशात

By admin | Updated: April 27, 2017 00:34 IST

शासनाकडून विपणनाचा खेळखंडोबा तीन चे 13 हजार हेक्टर क्षेत्र झाल्याने तुरीचे वाळूसारखे उत्पादन

जळगाव : जिल्हाभरात 2016 च्या हंगामात तुरीचे क्षेत्र 2015 च्या खरिपाच्या तुलनेत तब्बल 10 हजार हेक्टरने वधारून 13 हजार हेक्टवर गेले. तुरीचे एक लाख 30 हजार क्विंटल एवढे उत्पादन आले. पण तूर खरेदी केंद्रांबाबत स्थिती बिकट असल्याने या शासकीय खरेदी केंद्रांवर फक्त 22 एप्रिलअखेर 86 हजार क्विंटल तूर खरेदी झाली आहे. उर्वरित 30 हजार क्विंटलपेक्षा अधिक तूर व्यापा:यांच्या घशात कवडीमोल दरात म्हणजेच 3800 ते 4000 रुपये क्विंटलप्रमाणे विकावी लागली. तूर खरेदी केंद्र 22 रोजी बंद झाल्याने जामनेर, बोदवड व मुक्ताईनगर या तीन शासकीय तूर खरेदी केंद्रांवर 11 हजार क्विंटल तूर मोजणीविना पडून आहे.  या वृत्तास जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने दुजोरा दिला आहे.  जळगाव येथे भारतीय अन्न महामंडळाचे तूर खरेदी केंद्र होते. तर जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, पाचोरा, चाळीसगाव, चोपडा, रावेर  व अमळनेर येथे नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू होते. जळगाव केंद्र तीन महिन्यात सुटय़ांचे दिवस वगळता फक्त 45 दिवस सुरू होते. फेब्रुवारी महिन्यात या केंद्रात शेतकरी व केंद्रसंचालकांमध्ये वाद झाल्याने हे केंद्र आठवडाभर बंद केले. तर इतर सर्व केंद्र हे नाफेडचे होते. त्यातील अनेक केंद्र जवळपास 20 ते 22 दिवस बारदानाअभावी बंद होते. आदेशांचे पालन केलेच नाहीपालकमंत्री यांनी मागील आठवडय़ात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जेवढी वाहने तूर विक्रीसाठी केंद्राच्या आवारात येतील त्या सर्व वाहनांमधील तुरीची मोजणी करावी.. रात्रीर्पयत खरेदी सुरू राहिली तरी केंद्र सुरू ठेवावेत, असे आदेश दिले होते. परंतु या आदेशांचे पालन संबंधित तूर खरेदी केंद्रांवर झालेले नसल्याची माहिती काही शेतक:यांनी दिली आहे. 2015 मध्ये तुरीचा तुटवडा होता. त्यामुळे 2016 च्या खरीप हंगामात शासनाने तुरीच्या विक्रमी उत्पादनासाठी कार्यक्रम राबविला. जिल्हाभरात 200 हेक्टरसाठी मोफत संकरित तुरीचे बियाणे दिले. तसेच 200 हेक्टरसाठी तुरीच्या रोपांचे मोफत वितरण केले. तुरीची रोपे तयार करण्यासाठी शासनाने शेडनेटधारक शेतक:यांना मदत केली. यामुळे  तुरीचे क्षेत्र वधारले. ते 2015 च्या खरिपाच्या तुलनेत 10 हजार हेक्टरने वधारून 13 हजार हेक्टरवर पोहोचले. संकरित तुरीमुळे हेक्टरी एक लाख 30 हजार क्विंटल एवढे उत्पादन आले. 22 रोजी शासनादेशानुसार तूर खरेदी केंद्र बंद केले. नाफेडच्या तीन केंद्रांवर 11 हजार क्विंटल तूर पडून आहे. तिची खरेदी करावी की नाही याबाबत शासनाने आदेश दिलेले नाहीत. इतर कुठल्याही केंद्रावर मात्र तूर पडून नाही. -एस.पी.माळी, विपणन अधिकारी, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन