गोव्याला जाणा-या वाहनाचा सोलापूर जिल्ह्यात अपघात, जामनेरचे तिघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 11:16 IST2018-06-20T11:16:57+5:302018-06-20T11:16:57+5:30

गोवा येथे बोलेरो गाडीने जात असलेले वाहन ५० फूट खोल खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात जामनेरच्या तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी मध्यरात्री सोलापुर जिल्ह्यातील करमाळा गावाजवळ घडली. 

Three people were killed and three others injured in the accident in Solapur district | गोव्याला जाणा-या वाहनाचा सोलापूर जिल्ह्यात अपघात, जामनेरचे तिघे ठार

गोव्याला जाणा-या वाहनाचा सोलापूर जिल्ह्यात अपघात, जामनेरचे तिघे ठार

जामनेर, (जि.जळगाव) : गोवा येथे बोलेरो गाडीने जात असलेले वाहन ५० फूट खोल खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात जामनेरच्या तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी मध्यरात्री सोलापुर जिल्ह्यातील करमाळा गावाजवळ घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेरचे शेख फारुक शेख रमजान (५५), शेख फरहान शे एहसान (२२) व शेख तहरीम शेख जफर (१९) हे मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास गोवा जाण्यासाठी जामनेरहून निघाले. रात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास त्यांची गाडी सुमारे ५० फूट खोल खड्ड्यात कोसळली. अपघातग्रस्त वाहनासोबतच जामनेरचे दुसरे वाहन देखील होते. यात येथीलच १० जण होते. मात्र ते पुढे निघून गेले. घटनास्थळी पोलिस पोहचल्यावर मृतांपैकी एकाच्या खिशात असलेल्या आधारकार्ड वरुन त्यांची ओळख पटली.

तसेच पुढे गेलेल्या गाडीतील एकाने मागील गाडी का आली नाही याची विचारणा करण्यासाठी मोबाईलवर संपर्क साधला असता तो पोलिसाने उचलल्याचे समजते. नगरसेवक रिझवान शेख, खलील शेख हे सहकार्यांसह रात्रीच घटनास्थळाकडे रवाना झाले. अपघाताचे वृत्त समजताच शहरात शोक व्यक्त केला जात आहे.

Web Title: Three people were killed and three others injured in the accident in Solapur district