शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

लग्नासाठी आलेल्या 3 जणांचा बस-दुचाकी अपघातात जागीच मृत्यू, जळगावातील हृदयद्रावक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 19:07 IST

जळगावातील वरणगाव येथे भरधाव एसटी बस व मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात होऊन दुचाकीवरील तीन जण जागीच ठार झाले. 

बालू चव्हाण

वरणगाव (जळगाव) : भरधाव एसटी बस व मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात होऊन दुचाकीवरील तीन जण जागीच ठार झाले. ही घटना सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सुसरी- पिंपळगाव खुर्द ता. भुसावळ दरम्यान घडली. हे तीनही जण लग्नासाठी मनूरहून पिंपळगावला आले होते. 

सचिन राजेंद्र शेळके (२६), भागवत प्रल्हाद शेळके (४३) आणि  जितेंद्र कैलास चावरे (३२, तिघे रा. मनूर बुद्रूक ता. बोदवड) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मनुर बुद्रुक येथील  शेळके परिवारातील तरुणाचे पिंपळगाव येथे  सोमवारी दुपारी विवाह होता. मनूर येथील नवरदेवाकडील तीन जण काही कामासाठी  वरणगावकडे मोटारसायकलने जात होते. त्याचवेळी भुसावळहून बोदवडकडे जाणाऱ्या बसने या मोटारसायकलला समोरुन जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की यात मोटारसायकलचा चुराडा झाला आणि तीनही जण जागीच ठार झाले.

नवरदेवाकडील तीन जण ठार झाल्याचे कळताच वरणगाव ग्रामीण रुग्णालयात  नातेवाईकांची एकच गर्दी उसळली होती. यातील सचिन शेळके याच्या पश्चात  आई वडील, पत्नी तीन वर्षाचा मुलगा आहे.  भागवत शेळके यांना मुलगा व मुलगी आहे तर  जितेंद्र चावरे याच्यावर वृद्ध आई वडीलांची जबाबदारी होती. घरातील तीन कर्ते अपघातात गेल्यामुळे त्यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

विजय जगन्नाथ शेळके (४५, रा . मनुर) यांच्या फिर्यादीवरुन  बसचालक दिलीप तायडे यांच्याविरुद्ध वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  तपास एपीआय आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय परशुराम दळवी  करीत आहेत. दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच लग्न घरी आनंदाऐवजी शोक पसरला. 

  

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघातDeathमृत्यूbikeबाईक