शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अतिप्रसंग आणि लग्नाच्या बाता, तिघी जणी ठरल्या कुमारी माता महिनाभरात तीन घटना

By विजय.सैतवाल | Updated: April 2, 2023 21:06 IST

मामे भावाकडून अतिप्रसंग तर कोठे पलायनातून ओढावले मातृत्व

जळगाव : काही घटनांमध्ये प्रेमाचे आकर्षण तर कोठे नात्यातील व्यक्तीकडूनच होणारा अतिप्रसंग यासह वेगवेगळ्या कारणांमुळे अविवाहीत असतानाच मुलींच्या नशिबी मातृत्व आल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे महिनाभरातीलच या तीन घटना असून कोठे मामे भावाने अतिप्रसंग केल्याने तर दुसऱ्या एका घटनेत पलायन केल्याने मुलगी गर्भवती राहिली. तिसऱ्या एका घटनेत तर कारणच माहित नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली व घरोघरी टीव्हीपाठोपाठ मोबाईलही आले. त्यात सध्या अनेक मालिका, चित्रपटांमध्ये बिभस्तपणा चांगलाच रंगवून दाखविला जात आहे. प्रेम कथा, त्यातून पलायन व पुढील सर्व कथानक समोर दिसल्यास या वयातील मुलं-मुली त्यास बळी पडतात. यातून मग शारीरिक आकर्षण वाढून नको तो प्रसंग ओढावतो व त्यातून कमी वयातच गर्भधारणा होते. अनेक वेळा मुलं-मुली पलायन करून जातात व त्यावेळीही अशा घटना घडतात. गर्भधारणा झाल्यानंतर ठराविक वेळेत त्याकडे लक्ष दिले गेल तर गर्भपात केला जाऊ शकतो. मात्र १६ आठवड्यांच्या पुढे गर्भ गेल्यास प्रसूतीशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळेच अविवाहीत असतानाही नशिबी मातृत्व येते.

महिनाभरातील हे बोलके प्रसंग

१) मामे भावाने लादले मातृत्व

१६ ते १७ वयोगटातील रावेर तालुक्यातील एका मुलीवर तिच्या मामाच्या मुलानेच अतिप्रसंग केला. त्यातून ती मुलगी गरोदर झाली. सध्या ही मुलगी आठ महिन्याची गर्भवती असून पोलिस जबाबात अतिप्रसंगाचा किस्सा समोर आला. सध्या या मुलीला बाल कल्याण समितीच्या स्वाधीन करण्यात आले असून महिनाभरात तिची प्रसूती होणार आहे.

२) पलायन केले आणि ओढावले मातृत्व

दुसरी एक घटना जळगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. या मुलीने एका मुलासोबत पलायन केले. तेथे त्यांच्यात शारीरिक संबंध आले व त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली व मातृत्व ओढावले.

३) १७ वर्षांच्या मुलीची प्रसूती

तिसरी घटना तर चक्रावणारी आहे. बारामती, फलटण या भागातून मोलमजुरीसाठी आलेल्या एका कुटुंबातील १७ वर्षीय मुलीची भुसावळ येथे प्रसूती झाली. मात्र ती गर्भवती आहे हे आम्हाला माहितच नव्हते, असे तिच्या आई-वडिलांचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे तिचे पालक याविषयी यंत्रणेला अधिक माहिती देत नाही की आधार कार्डही देत नाहीये. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करणे अशक्य होत आहे.

पालकांचे दुर्लक्ष करते आयुष्य उद्ध्वस्तअशा प्रकारच्या घटना वाढत आहे. यासाठी पालकांनी मुला-मुलींच्या हालचाली, त्यांची वागणूक याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मुलीची मासिक पाळी नियमित येते की नाही, याकडे मुलीच्या आईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. तसेच मुलाच्याही चुकीमुळे एखाद्या मुलीने बाळाला जन्म दिला व तशी तक्रार झाल्यास थेट बलात्काराचा गुन्हा दाखल होतो. त्यामुळे पालकांचे दुर्लक्ष झाल्यास मुलगा असो की मुलगी या दोघांचेही आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते.

तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडियावर नको ते प्रसंग सहज उपलब्ध होऊ लागल्याने मुले-मुली त्याच्या आहारी जात आहे. त्यामुळे अविवाहीत असतानाच मुलींना गर्भधारणा होते. यात अनेक वेळा मुलगा हा नात्यातीलच असतो. त्यामुळे मुलगा असो की मुलगी यांच्या हालचाली, त्यांच्यातील बदल याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेेचे आहे. कायद्याने होणाऱ्या कारवाईसाठीदेखील आई-वडिलांची भूमिका महत्त्वाची असून लैंगिक शिक्षण काळाची गरज झाली आहे.- डॉ. उदयसिंग पाटील, ट्रेनर ऑफ ट्रेनर, सुरक्षित गर्भपात मार्गदर्शन संस्था (आय-पास)

टॅग्स :Jalgaonजळगाव