Three of the jamner were killed as Sangamner was pressed under a cotton truck | संगमनेरला कापसाच्या ट्रकखाली दाबले गेल्याने जामनेरचे तिघे ठार
संगमनेरला कापसाच्या ट्रकखाली दाबले गेल्याने जामनेरचे तिघे ठार

ठळक मुद्देजामनेरच्या व्यापाऱ्यासोबत गेले होते तिघे जणअपघाताचे वृत्त समजल्यानंतर नातेवाईक संगमनेरकडे रवानाकापसाने भरलेल्या ट्रकवर बसलेले होते तिघे जण

लोकमत न्युज नेटवर्क
जामनेर : कापुस खरेदी करुन परत येत असलेली मिनी ट्रक संगमनेर जवळ उलटल्याने त्याखाली दाबले जाऊन जामनेर येथील तिघांचा दुदैर्वी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. मयत तिघे शहरातील इस्लामपुरा व घरकुल परिसरातील रहिवासी आहेत. या घटनेमुळे या भागात शोककळा पसरली आहे. अपघातात चालकासह तीन जखमी झाले आहेत.
अपघाताचे वृत्त कळताच मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक व्यापाऱ्यांसोबत कापुस खरेदीसाठी संगमनेरला गेलेल्या वाहनासोबत शेख परवेझ शेख नासीर (वय २२ रा. ईस्लामपुरा), शेख जुनेद शेख भिकन (वय २१) व शेख फरमान शेख हारुन (वय २२, दोन्ही रा.घरकुल परिसर,जामनेर) हे गेले होते. वाहनात कापुस भरल्यानंतर परत येत असतांना गावाबाहेरील अरुंद रस्त्यावर गाडी पलटी झाली. यावेळी तिघे जण ट्रकमध्ये भरलेल्या कापसावर बसले होते. गाडी पलटी होताच त्याखाली दाबले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेतील तिनही मयत गरीब कुटुंबातील आहेत.

Web Title: Three of the jamner were killed as Sangamner was pressed under a cotton truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.