जामनेरमध्ये भीषण अपघातात माय लेकीसह तीन ठार; रिक्षाला सिमेंट मिक्सरची जोरदार धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 23:44 IST2025-12-13T23:38:24+5:302025-12-13T23:44:13+5:30
जामनेर तालुक्यातील गंगापुरी ते गारखेडे दरम्यान ही घटना घडली.

जामनेरमध्ये भीषण अपघातात माय लेकीसह तीन ठार; रिक्षाला सिमेंट मिक्सरची जोरदार धडक
मोहन सारस्वत
जामनेर: भुसावळहून जामनेरकडे येत असलेल्या प्रवासी रिक्षाला समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सर वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात माय लेकीसह ३ जण ठार तर पाच जण जखमी झाले. ही घटना शनिवारी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील गंगापुरी ते गारखेडे दरम्यान घडली.
मृतांमध्ये सरला गोपाळ निंबाळकर (४२) आणि त्यांची मुलगी निकिता गोपाळ निंबाळकर (२०, दोन्ही रा.चिंचखेडे बुद्रुक, ता.जामनेर) आणि प्रमोद श्रीराम गुरुभैया (३२, रा.तळेगाव, ता.जामनेर) यांचा समावेश आहे.
जखमींमध्ये जयेश निंबाळकर (१६), योगेश गायकवाड (४५, रिक्षा चालक, रा.विवेकानंद नगर, जामनेर), सुरेखा विलास कापडे (५०) संगीता सुभाष चौधरी (५०, दोन्ही रा. छत्रपती संभाजी नगर), अखिलेश कुमार (५०, रा.उत्तरप्रदेश) यांचा समावेश आहे.