जळगाव जिल्ह्यात एक दिवसात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:19 IST2018-10-15T22:18:14+5:302018-10-15T22:19:56+5:30
भडगाव तालुक्यातील खेडगाव येथील गोकुळ खुशाल माळी (वय ३५) या तरुण शेतक-याने आडळसेच्या जंगलात बाभळीच्या झाडास गळफास घेत आपले जीवन संपविले.

जळगाव जिल्ह्यात एक दिवसात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
ठळक मुद्देखेडगाव,खर्ची व सार्वेतील शेतकऱ्यांची आत्महत्यानापिकी व वाढत्या कर्जामुळे टोकाचा निर्णयदुष्काळीस्थितीमुळे संकटात पडली भर
जळगाव : भडगाव तालुक्यातील खेडगाव येथील गोकुळ खुशाल माळी (वय ३५) या तरुण शेतक-याने आडळसेच्या जंगलात बाभळीच्या झाडास गळफास घेत आपले जीवन संपविले. तर एरंडोल तालुक्यातील खर्ची बुद्रूक येथील समाधान भगवान मोपारी (वय ३२) या शेतकºयाने शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. पारोळा तालुक्यातील सार्वे येथील शेतकºयाने विष प्राशन करीत आत्महत्या केली. नापिकी, कर्जबाजारीपण आणि दुष्काळाचे सावट यामुळे एकाच दिवशी तीन शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे.